शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

१ एप्रिलपासून करवाढ लागू

By admin | Updated: January 15, 2015 00:54 IST

कर वाढीचा संबंधित प्रस्ताव आता स्थायी समितीच्या बैठकीत ठेवून नंतर महपालिका सभागृहात मंजूर केला जाईल. त्यानंतर १ एप्रिल २०१५ पासून करवाढ लागू होईल. करात नेमकी किती वाढ होईल,

मनपा : शहराची सहा भागात विभागणी नागपूर : कर वाढीचा संबंधित प्रस्ताव आता स्थायी समितीच्या बैठकीत ठेवून नंतर महपालिका सभागृहात मंजूर केला जाईल. त्यानंतर १ एप्रिल २०१५ पासून करवाढ लागू होईल. करात नेमकी किती वाढ होईल, याची निश्चित माहिती कुणीही द्यायला तयार नाही. असे असले तरी तज्ज्ञांनुसार करात तब्बल ४० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय मालमत्ता करात मलजल लाभ कर, पाणी लाभ कर तसेच पथ कर असे तीन नवे कर समाविष्ट करण्यात आले आहेत. यापूर्वी आकारण्यात येणारा एक टक्के दिवाबत्ती कर रद्द करण्यात आला आहे. नव्या कर प्रणालीमध्ये वार्षिक भाडे मूल्य (एएलवी) ला आधार मानण्यात आले असून रेडिरेकनरनुसार कर वसुली होणार नाही हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. आता शहराची सहा भागात विभागणी करून त्या वर्गीकरणाच्या आधारावर कर वसुली केली जाईल. कर संकलन समितीचे सभापती गिरीश देशमुख यांनी सांगितले की, नव्या कायद्यानुसार येत्या आर्थिक वर्षात लागू करावयाच्या कर प्रणालीची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करून तिला महापालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक आहे. नागपूरकरांचे हित विचारात घेऊन नवी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. ती सभागृहात सादर केली जाईल. सभागृहाला त्यात सुधारणा करण्याचा अधिकार असून सभागृहाच्या संमतीनंतरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. नव्या कायद्यानुसार तीन नवे कर लागू करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ते लागू केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाडेकरू असतील तर अधिक कर आकारला जात होता. याची दखल घेत यासाठी एक नवा नियम तयार करण्यात आला आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)