शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एसी तिकिटांवर जीएसटी क्रमांकासह टॅक्सची माहिती

By admin | Updated: July 2, 2017 02:42 IST

वस्तू व सेवा कर (जीएसटी) आजपासून लागू झाल्यानंतर भारतीय रेल्वेने आपल्या एसी कोचच्या तिकिटांवर

तिकीट रद्द करताना आल्या तांत्रिक अडचणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वस्तू व सेवा कर (जीएसटी) आजपासून लागू झाल्यानंतर भारतीय रेल्वेने आपल्या एसी कोचच्या तिकिटांवर जीएसटीनुसार वसुली सुरू केली आहे. परंतु स्लिपर क्लासच्या तिकिटांवर जीएसटी आकारल्या जात नाही. यात १ जुलैपूर्वी खरेदी केलेले तिकीट रद्द करताना काही तास तांत्रिक अडचणी आल्या. जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने एका प्रवाशाने नागपूर ते निजामुद्दीनपर्यंत खरेदी केलेल्या एसी ३ कोचच्या तिकिटांचा आढावा घेतला. दरम्यान, या तिकिटात काही नव्या बाबी आढळल्या. या तिकिटांच्या वरील भागात एसएसी आणि काही क्रमांक दिले होते. एसएसी म्हणजे सर्व्हिस अकाऊंट कोड. तिकिटात जीएसटीआयएन क्रमांकही देण्यात आला होता. हे तिकीट डिपार्टमेंटच्या वतीने रेल्वेने जारी केल्याचा क्रमांक होता. त्यानंतर स्टेट आॅफ सप्लाय आणि त्यापुढे २७ महाराष्ट्र असे लिहिलेले होते. याचा अर्थ हे तिकीट कोणत्या राज्यातून आणि शहरातून जारी केले हे त्यावर नमूद होते. तिकिटाच्या सर्वात खालील भागात कापण्यात आलेला जीएसटी (एसजीएसटी आणि सीजीएसटी)ची विस्तृत माहिती होती. या नव्या बदलाबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, एसी कोचच्या प्रवासात पूर्वी ४.५ टक्के सेवा कर लागत होता. त्याऐवजी आता ५ टक्के जीएसटी घेण्यात येत आहे. यामुळे एसीच्या प्रवासभाड्यात अधिक वाढ झालेली नाही. आज पहिल्याच दिवशी तिकीट रद्द करण्यात काही तांत्रिक अडचणी आल्या. मात्र मुंबई मुख्यालयात डाटाबेसमध्ये आवश्यक ते बदल करून या अडचणी लवकरच सोडविण्यात आल्या. तोपर्यंत प्रवाशांना संगणकाऐवजी मॅन्युअल कॅन्सल तिकीट जारी करण्यात आले. यामुळे प्रवाशांना कुठलीही असुविधा झाली नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी किती एसी तिकिटांची विक्री झाली, त्याची माहिती रविवारी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.