शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

टाटा सुमो उलटली; नऊ जखमी

By admin | Updated: August 3, 2016 02:47 IST

वडिलांच्या अंत्यसंस्करासाठी चंद्रपूरहून भिवापूरला येताना चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव टाटा सुमो उलटली.

भिवापूर परिसरातील घटना : अंत्यसंस्काराला येताना झाला अपघात भिवापूर : वडिलांच्या अंत्यसंस्करासाठी चंद्रपूरहून भिवापूरला येताना चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव टाटा सुमो उलटली. त्यात मुलासह अन्य आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना भिवापूरपासून पाच कि.मी. अंतरावरील भंडारा जिल्ह्यातील नीलज फाटा (ता. पवनी) परिसरात मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. कमला शंकरराव तुपकर (६५), कविता विठ्ठल कामडी (४५), विठ्ठल फागोजी कांबळी (५०), मंदा शामराव बेले (५०), भाऊराव शामाजी बेले (५९) सर्व रा. चंद्रपूर, विकास गजानन शेंडे (१९, रा. ब्राह्मणी, जिल्हा भंडारा), सुरेश बिजाराम भुरे (४५), मंथन सुरेश भुरे (५), अमृत सुरेश भूरे (३) तिघेही रात्र चंद्रपूर अशी जखमींची नावे आहेत. भिवापूर येथील बिजाराम भुरे (८६) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. सुरेश भुरे हा त्यांचा मुलगा असून, तो चंद्रपूरला राहतो. तो त्यांचे कुटुंबीय व काही नातेवाईकांना घेऊन वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी एमएच-३०/एल-६७४१ क्रमांकाच्या टाटा सुमोने चंद्रपूरहून भिवापूरला येत होते. ही सुमो त्यांनी किरायाने घेतली होती. दरम्यान, नीलज फाटा परिसरात चालकाचा ताबा सुटला आणि सुमो उलटली. त्यात नऊ जण जखमी झाले. पवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी) आधी वडिलांची भेट या अपघातात सुरेश भुरे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्याचा सल्ला भिवापूर येथील डॉक्टरांनी दिला. मात्र, सुरेश यांना उपचारापूर्वी वडिलांची शेवटची भेट घ्यावयाची होती. नागपूरला जाण्याचा तगादा वाढल्याने शेवटी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. त्यामुळे कुटुंबीयांचाही नाईलाज झाला. सुरेश यांनी जखमी अवस्थेत घर गाठले. वडिलांचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर ते नागपूरच्या प्रवासाला निघाले. या घटनेमुळे नागरिकांनी जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली होत.