शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

‘टास्क फोर्स’ला रामराम!

By admin | Published: August 31, 2016 2:18 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरणे मागील वर्षी ३१ आॅगस्ट रोजी बरखास्त

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरणे मागील वर्षी ३१ आॅगस्ट रोजी बरखास्त झाली होती. प्राधिकरणांशिवाय कामकाज चालविणे अवघड असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून वर्षभरासाठी ‘टास्कफोर्स’ स्थापन करण्यात आले होते. परंतु नवा विद्यापीठ कायदा अजूनही लागू न झाल्यामुळे राज्यातील सर्वच विद्यापीठांत ३१ आॅगस्टनंतर नेमके काय करायचे हा संभ्रम आहे. या धर्तीवर नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ‘टास्क फोर्स’ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नवा विद्यापीठ कायद्याचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे. मागील वर्षी शासनाच्या निर्देशांनुसार ३१ आॅगस्ट रोजी सर्व विद्यापीठांतील प्राधिकरणे बरखास्त करण्यात आली होती. ३१ आॅगस्टनंतर प्राधिकरण सदस्यांची रिक्त झालेली पदे कोणत्याही पद्धतीने वर्षभर भरण्यात येऊ नयेत, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. विद्यापीठाचे कामकाज प्राधिकरणांशिवाय चालविणे ही कठीण बाब असल्याने विद्यापीठात ‘टास्क फोर्स’ गठित करण्यात आले होते. वर्षभर याच्या मदतीने विद्यापीठाचा कारभार चालला. परंतु ३१ आॅगस्टनंतर नेमके काय करायचे याबाबत शासनाकडून अद्याप कुठल्याही सूचना आलेल्या नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. आम्हाला शासनाने अद्याप काहीही कळविलेले नाही. त्यामुळे १ सप्टेंबरपासून काय करायचे याबाबत संभ्रम आहे. परंतु मी व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी मिळून ‘टास्क फोर्स’ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले. १ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व कुलगुरुंची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत बैठक आहे. या बैठकीचा ‘अजेंडा’ कुणालाही सांगण्यात आलेला नाही. यात काही सूचना मिळण्याची शक्यता आहे, असे कुलगुरूंनी सांगितले.(प्रतिनिधी) नव्या ‘टास्क फोर्स’मध्ये नवे चेहरे ? दरम्यान, नवीन ‘टास्क फोर्स’ बनविण्यात येणार की नाही याबाबतदेखील प्रश्नच आहेच. १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर नेमकी रूपरेषा स्पष्ट होईल. आल्यानंतर नवीन ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नव्या ‘टास्क फोर्स’मध्ये सर्वच जुने सदस्य राहतील, असे नाही. प्रत्येकाची वर्षभरातील कामगिरी, विद्यापीठातील सहभाग या आधारावर विचार करण्यात येईल. नवे सदस्यदेखील सहभागी होऊ शकतात, असे डॉ. काणे यांनी सांगितले. जुन्या ‘टास्क फोर्स’मधील काही सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतलाच नव्हता. त्यांचे काम अजिबात प्रभावी नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली.