शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ओळखीतील विखारी नजरांतून ‘टार्गेट’

By admin | Updated: September 10, 2015 03:39 IST

महाराष्ट्राची ओळख ही महिला व मुलींसाठी सुरक्षित अन् शांत राज्य अशीच आहे. परंतु बदलत्या काळासोबत वासनांधता वाढीस लागली आहे.

बलात्काराचे प्रमाण वाढले :‘टीनएजर्स’ धोक्यातयोगेश पांडे नागपूरमहाराष्ट्राची ओळख ही महिला व मुलींसाठी सुरक्षित अन् शांत राज्य अशीच आहे. परंतु बदलत्या काळासोबत वासनांधता वाढीस लागली आहे. ‘टीनएजर्स’ मुलींवरील बलात्काराची देशातील सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्रातच नोंदविण्यात आली. दुर्दैवाची बाब म्हणजे जवळपास ९८ टक्के घटनांमध्ये आरोपी ही ओळखीतीलच व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) अहवालातील आकडेवारीतून हे काळे चित्र समोर आले आहे.२०१४ या वर्षात राज्यामध्ये ३ हजार ४३८ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. यातील १ हजार ७२४ बलात्कार हे अल्पवयीन मुलींवर झाले आहेत. खेळण्या बागडण्याच्या वयातील लेकींवरदेखील हिंस्त्र मनोवृत्तीच्या नराधमांची नजर पडत आहे. मुलींचे आयुष्य उद््ध्वस्त करणारे बहुतांश नराधम हे अनोळखी व्यक्ती नसून नाते-संबंध अन् नेहमीच्या परिचयातीलच आहेत. एकूण प्रकरणांपैकी ३ हजार ३८३ प्रकरणांत आरोपी ओळखीतील व्यक्तीच आहे. यात अगदी अगदी वडील, भाऊ यांसारख्या रक्तातील नात्यांपासून ते जवळील नातेवाईक, शेजारी, परिचित इत्यादींचा समावेश आहे. २०१३ च्या तुलनेतदेखील बलात्काराचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१३ साली ३ हजार ६३ प्रकरणांची नोंद झाली होती. २०१२ साली हेच प्रमाण १ हजार ८३९ इतके होते.‘टीनएजर्स’वर विखारी नजरा२०१४ सालातील ३ हजार ५३८ पैकी १ हजार ९६ बलात्कार हे लहान बालिका व ‘टीनएजर्स’ यांच्यावर झालेले आहेत. यात ६ वर्षांखालील मुलींची संख्या ही ११२ इतकी आहे. ६ ते १२ या वयोगटातील २५३ मुलींवर बलात्कार झाला. देशभरात १६ वर्षांपर्यंतच्या मुलींवरील बलात्काराचे सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्रातच आहे.