शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

टँकरची प्रतीक्षा संपली, २.२३ लाख लोकांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरालगतच्या भागातील नागरिकांना तीन वर्षापूर्वी टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती. ३५० ते ४०० टँकर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरालगतच्या भागातील नागरिकांना तीन वर्षापूर्वी टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती. ३५० ते ४०० टँकर सुरू होते. परंतु आता ही परिस्थिती राहिलेली नाही. अशा २ लाख २३ हजार नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला आहे. १२० टँकर बंद करण्यात आले. दिवसाआड पाणी पुरवठा होणाऱ्या २ लाख १३ हजार नागरिकांना दररोज पाणी मिळत आहे. कमी दाबाने पाणीपुवठा होणाऱ्या १३२ वस्त्यांतील समस्या मार्गी लागली. ४० हजार घरांना नवीन जोडण्या दिल्या. ११ जलकुंभाची कामे करण्यात आली. पाणीपुरवठ्यात वाढ करून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला असा लेखाजोखा माहिती मावळते जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडला.

शहरात सर्व भागात पाणी पुरवठा सुरळीतरीत्या व्हावा याकरिता पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढविण्याकडे भर दिला. काही भागात नागरिकांकडूनही टाकीला विरोध होत असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून ‘डबल डेकर’ पाण्याची टाकी तयार करण्याची संकल्पना पुढे आणली. मेट्रोच्या उड्डाण पुलाच्या धर्तीवर एकाच ठिकाणी दोन पाण्याच्या टाक्या निर्मितीची संकल्पना पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न केला. नागपुरातील प्रभाग ३४ मधील चक्रपाणी नगर भागात ही टाकी तयार होत आहे. तसेच हुडकेश्वर-नसराळा क्षेत्रातील तीन नवीन टाक्या उभारल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पदाधिकारी व अधिकाºयांनी यासाठी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

....

तीन वर्षात झालेला बदल

- २४ बाय ७ योजनेद्वारे १० कमांड एरिया वाढवून २३ केल्या

- पाणी पुरवठा ६६५ एमएलडी वरून ६५७ एलएलडी

- उपभोक्तांची संख्या ३ लाख ३६ हजार ६८६ वरून ३ लाख ७५ हजार ७५८

- पाईपलाईन, ५९७.२६ किमी वरून ६८७.५० किमी

- गृह नळजोडणी, १ लाख ६८ हजार ९५३ वरून २ लाख ४६ हजार ७०६

- २९ टक्के पाणी बिल डिजिटल पेमेंटद्वारे जमा

- अवैध नळजोडणी कापण्यासाठी झोनमध्ये पथक गठीत

- २५ कॉमन एरिया मध्ये २४ बाय ७ योजना लागू, ६ लाख ७ हजार ९४ लोकांना लाभ

- दूषित पाणी पुरवठ्याची १२८ भागतील समस्या मार्गी.

- १५० किमी पाईप लाईनचे जाळे

- २८ उद्यानांमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम लागू

- वाॅटर ऑडिटची सुरूवात झाली.

- ५ लिकेजेस दुरूस्त, ७ एमएलडी पाणी बचत

- ५०२ विहिरींची स्वच्छता,नवीन ४०९ बोअरवेल

-टंचाई परिस्थितीत २८९ विहीरींमधून पाणी पुरवठा

- अमृत योजनेंतर्गत ३७७ किमी पाईप लाईन पैकी २६० किमी पूर्ण

- ११ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरू

- १७० लेआऊटला पाणी पुरवठा सुरू