‘लोकमत कॅम्पस क्लब’ चा उपक्रम : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर : भरगच्च भरलेले शाळेचे सभागृह, विद्यार्थी-विद्यार्थिनींची ताणलेली उत्सुकता अशा उत्साहाने परिपूर्ण वातावरणात अचानक त्याची ‘एन्ट्री’ होते अन् संगीत आणि तालाच्या माध्यमातून संवाद घडून येतो. विद्यार्थ्यांची अन् त्याची अक्षरश: गट्टी जमते अन् सहजपणे विद्यार्थी त्याच्याशी गुजगोष्टी करतात. धम्माल होते, मज्जा येते. सोबतच ‘लोकमत कॅम्पस क्लब’ हा बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा उपयुक्त आहे याची माहिती मिळते. कार्यक्रमानंतर तो विद्यार्थ्यांचा निरोप तर घेतो, परंतु त्यांच्या मनात आत्मविश्वास अन् प्रेरणा जागवून जातो.‘लोकमत कॅम्पस क्लब’चा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर ‘डीआयडी लिटील मास्टर फेम’ तनय मल्हार याने गुरुवारी शहरातील निवडक शाळांना भेटी दिल्या. ‘कॅम्पस क्लब’ची माहिती देत विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह द्विगुणित केला. त्याच्या या भेटीला शाळांशाळांमधून भरघोस प्रतिसाद मिळाला. शालेय शिक्षणाबरोबर मुलांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने स्थापन केलेल्या ‘लोकमत बालविकास मंच’चे जुने नाते आता ‘कॅम्पस क्लब’ या नव्या स्वरूपाद्वारे विद्यार्थ्यांशी जोडले गेले आहे. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तनय मल्हारने आज शहरातील ललिता पब्लिक स्कूल, वर्धमाननगर, सेंट पॉल हायस्कूल, पिंपळाफाटा, आर.एस.मुंडले हायस्कूल, समर्थनगर व सोमलवार मराठी प्राथमिक शाळा, रामदासपेठ शाळांना भेटी देऊन येथील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या सर्व शाळांमध्ये तनयने यावेळी हिंदी, मराठी चित्रपटगीतांवर नृत्य सादर केली. शिवाय विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेतले. ‘कॅम्पस क्लब’मध्ये सहभागी होण्याच्या त्याने केलेल्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.ललिता पब्लिक स्कूलतनयने सर्वात अगोदर वर्धमाननगर येथील ललिता पब्लिक स्कूल येथे भेट दिली. यावेळी शाळेच्या संचालिका चेतना टांक यांनी तनयचे स्वागत केले. प्राचार्य विनीशा मेलन यांच्या उपस्थितीत तनयने नृत्य सादर करीत धम्माल उडविली. कार्यक्रमामध्ये सुनिता शंभरकर, आशिष गुप्ता, मिताली काशीकर, सोनाली बांगडे, संध्या भोयर, सचिन अंजीकर, सचिन यादव आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.सेंट पॉल हायस्कूलपिंपळाफाटा येथील सेंट पॉल हायस्कूल येथे तनयने दीड तास विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘कॅम्पस क्लब’चा उद्देशही समजावून सांगितला. तनयने जेव्हा नृत्य सादर केले तेव्हा विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. यावेळी शाळेचे संचालक राजाभाऊ टांकसाळे व प्राचार्य देवांगणा पुंडे उपस्थित होते. संचालन वंदना मते व किरणबाल वेलफ्रेंड यांनी केले.आर.एस.मुंडले हायस्कूलसमर्थनगर येथील आर.एस. मुंडले हायस्कूल येथील प्राचार्य (प्राथमिक विभाग) शिवानी कोकर्डेकर यांच्या उपस्थितीत तनयने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.यावेळी रश्मी देशपांडे, रेखा बर्मन, रचना पटनाईक, अनघा शेंडे, ज्योत्स्ना जोद, प्रांजली कुरळकर, आरती कुळकर्णी, सोनाली सदावर्ते, अपर्णा शहापूरकर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.सोमलावर मराठी प्राथमिक शाळारामदासपेठ येथील सोमलवार मराठी प्राथमिक शाळेत मुख्यध्यापिका कठाळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान तनयने सादर केलेल्या नृत्याने धम्माल उडविली. यावेळी राजश्री गाणार, भारती पराते, कांचन गहेरवार, श्वेता नानोटी, स्मिता सराफ, ममता शोभणे, सुचिता अग्निहोत्री आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘तनय’च्या नृत्याची शाळांमध्ये धम्माल
By admin | Updated: August 24, 2014 01:13 IST