शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तानाजींनी वाढविला ताण

By admin | Updated: May 18, 2017 02:23 IST

महापालिकेतील काँग्रेसच्या २९ सदस्यांपैकी १७ सदस्यांनी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्यावर अविश्वास व्यक्त करून ....

महाकाळकर यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात ? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतील काँग्रेसच्या २९ सदस्यांपैकी १७ सदस्यांनी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्यावर अविश्वास व्यक्त करून गटनेतेपदासाठी तानाजी वनवे यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रावरील स्वाक्षरींची बुधवारी पडताळणी करण्यात आली. यात १६ नगरसेवकांनी वनवे यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे महाकाळकर यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. तानाजी वनवे यांनी १७ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याबाबतचे पत्र मंगळवारी विभागीय आयुक्तांना दिले होते. परंतु वनवे यांनी विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनावर आम्ही सह्या केल्या नसल्याचा दावा दिनेश यादव, नेहा निकोसे व परसराम मानवट या तिघांनी केला होता. रात्रभरात चक्र फिरले अन् या तिघांनी आपली भूमिका बदलविली. बुधवारी तिघेही वनवे यांच्या गटात सहभागी झाले. तर महाकाळकर यांनी वनवे यांनी सादर केलेल्या पत्रातील चार सदस्यांनी सह्या केल्या नसल्याचा दावा केला होता. दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे करण्यात आल्याने विभागीय आयुक्तांनी महापालिकेचे निगम सचिव हरीश दुबे यांना १७ सदस्यांच्या स्वाक्षरींची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नगरपरिषद प्रशासन विभागाचे प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात व्हिडिओ चित्रीकरणात सदस्यांच्या स्वाक्षरींची पडताळणी करण्यात आली. १६ सदस्यांनी वनवे यांना पाठिंबा दर्शविला. यात प्रफुल्ल गुडधे, संदीप सहारे, जुल्फेकार अहमद भुट्टो, तानाजी वनवे, कमलेश चौधरी, हर्षला साबळे, गार्गी चोपरा, पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, मनोज गावंडे, परसराम मानवटकर, आशा उईके, दिनेश यादव, प्रणिता शहाणे, नेहा राकेश निकोसे व अंसारी सय्यदा बेगम मो. निजामुद्दीन आदींचा समावेश आहे. वनवे यांना १६ सदस्यांनी पाठिंबा दर्शविल्याने महाकाळकर यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. दरम्यान बुधवारी संजय महाकाळकर यांनी विभागीय आयुक्तांना पत्र दिले. यात नेहा राकेश निकोसे, रमेश पुणेकर, परसराम मानवटकर व दिनेश यादव आदींच्या तानाजी वनवे यांच्या पत्रावरील स्वाक्षऱ्या रद्द समजण्यात याव्या, अशी विनंती केली होती. विशेष म्हणजे यावर या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ४ मार्च २०१७ रोजी नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत महापालिकेतील गटनेता म्हणून संजय महाकाळकर यांची निवड करण्यात आली होती. यात २६ नगरसेवक ांचा पाठिंबा असल्याचे दर्शविण्यात आले. परंतु महाकाळकर यांना १७ नगरसेवकांचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर प्रगती भवनात मंगळवारी नगरसेविका हर्षला साबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात विरोधी पक्षनेतेपदासाठी तानाजी वनवे यांची निवड करण्यात आली. याबाबतच्या ठरावाची प्रत विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनाला जोडण्यात आली आहे. स्वाक्षरी पडताळणीचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आल्याची माहिती निगम सचिव हरीश दुबे यांनी दिली. महापालिकेतील काँग्रेसच्या बहुसंख्य नगरसेवकांना संजय महाकाळकर यांच्या गटनेतेपदाला विरोध असल्याचे अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणले होते. मंगळवारी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत गटनेतेपदासाठी माझी निवड करण्यात आली. - तानाजी वनवे, नगरसेवक