शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या सिनेटची सभा ऑफलाईन घ्या : सदस्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 22:30 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची सभा ३ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. मात्र या प्रणालीला अनेक सदस्यांनी विरोध केला असून ही सभा ऑफलाईनच झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रकोप सुरू असताना ऑफलाईन सभा खरोखरच शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देऑनलाईन प्रणालीला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची सभा ३ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. मात्र या प्रणालीला अनेक सदस्यांनी विरोध केला असून ही सभा ऑफलाईनच झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रकोप सुरू असताना ऑफलाईन सभा खरोखरच शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार सर्व वित्तीय अंदाजांकरिता, अर्थसंकल्पीय विनियोजनांकरिता व विद्यमान तसेच भविष्यातील शैक्षणिक कार्यक्रमांच्या बाबतीत सामाजिक परिणामांची माहिती देण्याकरिता सिनेट हे प्रमुख प्राधिकरण आहे. सिनेटची सभा वर्षातून दोन वेळाच होते. नागपूर विद्यापीठाच्या सिनेटमध्ये ७६ सदस्य असून त्यातील ४१ सदस्य हे निवडून आलेले आहेत. सिनेटच्या बैठकीची सर्वच सदस्यांना प्रतीक्षा असते व त्यात विविध मुद्दे मांडले जातात.ही सभा ऑनलाईन माध्यमातून झाली तर अनेक अडचणी येऊ शकतात. विद्यापीठाने याअगोदर व्यवस्थापन परिषदेसह विविध प्राधिकरणांच्या बैठका ऑनलाईन घेतल्या. मात्र त्याबाबत सदस्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काही बैठका तर विद्यापीठाला प्रत्यक्ष घ्याव्या लागल्या. सिनेटची बैठकीत सदस्याची संख्या जास्त असते. त्यामुळे त्यात मुद्दे मांडताना अडचण येऊ शकते. शिवाय सर्व सदस्यांकडे लॅपटॉप असेलच असे नाही. इंटरनेटचीदेखील व्यवस्था करावी लागेल. त्यामुळेच ही सभा ऑफलाईन माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. यासंदर्भात २१ सदस्यांचे पत्र कुलगुरूंसह राज्यपालांनादेखील पाठविण्यात आल्याची माहिती मनमोहन बाजपेयी यांनी दिली.

प्रत्यक्ष सभा घेण्यात अडचण कायनागपूरला आले असता आपल्या विद्यापीठात प्रत्यक्ष सभा झाली. तसेच नागपूर महानगरपालिकेची सभासुद्धा ऑफलाईन पद्धतीने झाली. संसद, विधिमंडळाचे सत्रदेखील प्रत्यक्ष झाले. अशा स्थितीत नागपूर विद्यापीठाला प्रत्यक्ष सभा घेण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे. सभा घेत असताना फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल अशी व्यवस्था करणे सहज शक्य आहे, अशी भूमिकादेखील सदस्यांनी मांडली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ