शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साक्षी महाराजांवर कायदेशीर कारवाई करा : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 19:37 IST

जाहीररित्या लोकशाहीविरोधी वक्तव्य केल्यामुळे उत्तर प्रदेशातील उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांचे भारतीय नागरिकत्व काढून घेण्यात यावे अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलोकशाहीविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जाहीररित्या लोकशाहीविरोधी वक्तव्य केल्यामुळे उत्तर प्रदेशातील उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांचे भारतीय नागरिकत्व काढून घेण्यात यावे अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.साक्षी महाराज यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भारताचे सार्वभौमत्व व अखंडता टिकविण्याची, राज्यघटनेतील तरतुदीनुसार कर्तव्य बजावण्याची व सत्याचे रक्षण करण्याची शपथ घेतली. परंतु, त्यांनी ही शपथ पाळली नाही. त्यांनी १६ मार्च २०१९ रोजी भारतीय लोकशाहीविरुद्ध जाहीर वक्तव्य केले. मोदी त्सुनामी अद्याप जीवंत आहे. आगामी लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीने देशाच्या नावावर लढवू. २०२४ नंतर देशात पुन्हा निवडणूक होणार नाही असे ते म्हणाले. यावरून त्यांचा देशातील लोकशाही संपविण्याचा डाव असल्याचे दिसून येते. हे वक्तव्य प्रिव्हेन्शन आॅफ इन्सल्ट टू नॅशनल आॅनर अ‍ॅक्ट-१९७१ मधील कलम २ अनुसार गुन्हा आहे. परिणामी, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे असे मून यांचे म्हणणे आहे. याचिकेमध्ये केंद्रीय गृह विभागाचे मुख्य सचिव, पोलीस उपमहासंचालक, नागपूर पोलीस आयुक्त व खासदार साक्षी महाराज यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. अ‍ॅड. अश्विन इंगोले याचिकेचे कामकाज पाहतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSakshi Maharajसाक्षी महाराज