शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

देशाला प्रगतिपथावर न्यावे

By admin | Updated: September 28, 2014 01:04 IST

भौतिक सुखासाठी आपण दोन पावले पुढे जातो, हे खरे आहे. हे करताना आपली नैतिकता सोडू नये. आम्ही मातांचा किती आदर करतो, हे पाहण्याची गरज आहे. दात्याने काय दिले हे सांगू नये,

जी.एम. टावरी यांचे प्रतिपादन : महावीर इंटरनॅशनलच्या नवीन चमूचे पदग्रहणनागपूर : भौतिक सुखासाठी आपण दोन पावले पुढे जातो, हे खरे आहे. हे करताना आपली नैतिकता सोडू नये. आम्ही मातांचा किती आदर करतो, हे पाहण्याची गरज आहे. दात्याने काय दिले हे सांगू नये, असे सांगताना देशाला प्रगतिपथावर नेण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट मत डॉ. जी.एम. टावरी यांनी येथे मांडले.समाजसेवा हेच ब्रीद असलेल्या महावीर इंटरनॅशनल, नागपूर सेंटरच्या दोन वर्षीय नवीन चमूचा पदग्रहण समारंभ रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये शनिवारी पार पडला. मुख्य पाहुणे म्हणून डॉ. टावरी बोलत होते. मंचावर विशेष अतिथी विजय बापना यांच्यासह मावळते अध्यक्ष सुरेश राठी, नवनिर्वाचित अध्यक्ष सविता अजय संचेती, सचिव भरत पारेख, नितीन शाह होते. यावेळी नवीन ३५ सदस्यांचा सत्कार आणि त्यांना शपथ देण्यात आली. विजय बापना म्हणाले की, हे व्यासपीठ समाजसेवेचे आहे. आपल्याला मिळालेल्या उत्पन्नापैकी काही वाटा समाजसेवेसाठी खर्च करा. सध्या नागपूर सेंटर प्रगतिपथावर असून समाज कार्यात पुढे राहावे. नवनिर्वाचित अध्यक्षा सविता संचेती म्हणाल्या की, सेंटरला नवीन ओळख देऊन प्रगतिपथावर नेणार आहे. याकामी सर्व सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास आहे. सामाजिक उपक्रमात सहकार्यासाठी त्यांनी कुटुंबीयांचे आभार मानले आणि दिवाळीत होणारे कार्यक्रम व नवीन उपक्रमांची रूपरेषा सांगितली. प्रारंभी मावळते अध्यक्ष सुरेश राठी यांनी दोन वर्षांतील कार्यक्रमांची माहिती दिली आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले. संचालन सोनल सिंघवी आणि अर्चना जव्हेरी यांनी केले तर सचिव भरत पारेख यांनी आभार मानले.पदग्रहण समारंभात खा. अजय संचेती, सुनील रायसोनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)संस्थेची नवीन कार्यकारिणीअध्यक्षा-सविता संचेती, सचिव-भरत पारेख, उपाध्यक्ष-शिव अग्रवाल, कोषाध्यक्ष तुषार सिंघवी, सहसचिव अरविंद गोलछा व विनीता माहेश्वरी. संचालक अर्चना जव्हेरी, प्रीमी सेठ, अजय गांधी, प्रकाश खेमका, अश्विन गोलछा, विनय माहेश्वरी.डायलिसिस सेंटर सुरू करणारसंस्थेतर्फे डायलिसिस सेंटर ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. सेंटरसाठी सुनील रायसोनी ११ लाख रुपये देणार आहेत. विजय बापना यांनी आर्थिक मदतीची घोषणा करताना सदस्यांना सहकार्याचे आवाहन केले.