शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला घेऊन जा गे मारबत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 21:28 IST

नागपूर शहरात पोळ्याच्या करीला दरवर्षी मारबतीची मिरवणूक निघते. जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐतिहासिक मारबत उत्सव यंदा कोरोनामुळे पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा झाला. मिरवणूक आणि धामधुमीत साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यावर निर्बंध घातले होते. त्यामुळे श्रद्धेय असलेल्या पिवळ्या मारबतीचे विसर्जन निवडक पदाधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आले.शहरात पोळ्याच्या करीला दरवर्षी मारबतीची मिरवणूक निघते. जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण करीत ही मिरवणूक नेहरू पुतळा, इतवारी, गांधीबाग, महाल, गांजाखेत चौक, गोळीबार चौक, तांडापेठ या भागातून जायची. शहराच्या विविध भागातून मोठ्या संख्येने लोक मारबत उत्सव बघायला रस्त्यावर उतरायचे. पण यंदा कोरोनामुळे प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली. पण पिवळी आणि काळी मारबतीला श्रद्धेचे स्थान असल्याने दोन्ही मारबतींची निर्मिती करून स्थापना करण्यात आली.

पूजाअर्चा करून बुधवारी मारबतीचे विसर्जन करण्यात आले. पिवळ्या मारबतीचे विसर्जन जागनाथ बुधवारी परिसरातच पार पडले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तरीही लोक मारबतीचे दर्शन घेण्यासाठी गल्लीबोळीत उभे होते. यावेळी उपस्थितांनी ‘कोरोनाला घेऊन जा गे मारबत...’ असे आवाहन केले. पूजाअर्चा करून विसर्जन झाले.यंदा पिवळी-काळी मारबत भेटलीच नाहीनेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत उत्सव समितीतर्फे काळ्या मारबतीची निर्मिती करण्यात येते. जागनाथ बुधवारी येथून निघणारी पिवळी मारबत आणि काळी मारबत यांची नेहरू पुतळ्याजवळ भेट होते. कोरोनामुळे यंदा त्यांची भेट झाली नाही. काळी मारबत उत्सव समितीने मिरवणूक न काढता नेहरू पुतळ्याजवळ मारबतीचे विसर्जन केले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिक