शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

अर्जुन परतला जगण्याची शिदोरी घेऊन

By admin | Updated: April 10, 2016 03:17 IST

सहा वर्षापूर्वी ११ वर्षाचा एक मुलगा, मुंबईच्या रेल्वेस्थानकावर समतोल फाऊंडेशनच्या सदस्यांना सापडला.

मंगेश व्यवहारे नागपूरसहा वर्षापूर्वी ११ वर्षाचा एक मुलगा, मुंबईच्या रेल्वेस्थानकावर समतोल फाऊंडेशनच्या सदस्यांना सापडला. घरातून पळून तो मुंबईत आला होता. रेल्वेस्थानकावरील मुलांसोबत राहून व्यसनांच्या आहारी गेला होता. या मुलाला नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरात आणण्यात आले. अंगावर मळकट फाटके कपडे, केस विसकटलेले, बालपणीच आयुष्य हरविल्यागत तो होता. प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरमध्ये त्याच्यावर अध्ययनाबरोबर आचार-विचारांचे संस्कार झाले. आपल्या आयुष्याची सहा वर्ष त्याने येथे घालविली. येथे तो स्वत:च्या आयुष्याबद्दल जबाबदार झाला. शिक्षण घेऊन सुसंस्कृत झाला. एक जबाबदार, संवेदनशील नागरिक म्हणून तो आज आपल्या घराकडे परतला आहे. जे संस्कार आई-वडिलांनी त्याच्यावर करायचे होते, ते प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरातून त्याच्यावर झाले आणि त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर आले. झारखंड येथील रहिवासी अर्जुन चौधरी असे त्याचे नाव. ११ वर्षाचा असताना अर्जुनने घरातून १०० रुपये घेऊन पळ काढला होता. मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर मुलांसोबत भटकत असताना तो समतोल फाऊंडेशनला सापडला. फाऊंडेशनने त्याला लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरात आणले. अतिशय जिद्दी आणि चिडखोर स्वभावाच्या अर्जुनला कशाचीही भ्रांत नव्हती. शिक्षणात तर त्याचे मनच रमत नव्हते. व्यसनांच्या आहारी गेल्याने त्याची मानसिकता ढासळलेली होती. आई-वडिलांबद्दल त्याची तसूभरही आस्था नव्हती. अशा अवस्थेत प्लॅटफॉर्म शाळेने त्याला सांभाळले. त्याची मानसिकता बदलविण्यासाठी समुपदेशन केले. त्याच्यावर आचार-विचारांचे संस्कार केले. त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याला खेळाकडे प्रवृत्त केले. हळूहळू तो इतर मुलांमध्ये रमला. त्याचे बोलणे, राहणे, वागणे यावर लक्ष केंद्रित केले. त्याच्यातील होत असलेले बदल लक्षात घेऊन, त्याला भविष्याची समज दिली. अध्ययनाकडे त्याच्यात आवड निर्माण केली. त्याला शाळेत दाखला मिळवून दिला. हळूहळू त्याच्या स्वभावात परिवर्तन झाले. तो नियमित शाळेत जायला लागला, अभ्यास करायला लागला. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. अर्जुन आज अकरावीत शिकतो आहे. आज तो जबाबदार, संस्कारीत झाला आहे. सहा वर्षे तो शाळेत शिकत असताना ज्ञानमंदिराच्या प्रकल्प प्रमुखांनी त्याच्या आई-वडिलांशी त्याची भेट करून दिली. अर्जुन लहानपणापासून त्याच्या मोठ्या वडिलांकडे राहत होता. त्यांचा थकता काळ असल्याने, अर्जुनला त्यांनी परत गावी बोलाविले आहे. अर्जुनलाही आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे. यापुढे आईवडिलांचा भविष्याचा आधार बनण्याचा संकल्प करून तो शनिवारी