शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांकडून वय व दुचाकीचे प्रतिज्ञापत्र घ्या; शिकवणी वर्गांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 11:59 IST

शिकवणी वर्ग संचालकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे वय किती आहे व ते कोणती दुचाकी चालविणार आहेत याची माहिती स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र घ्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.

ठळक मुद्देशिकवणी वर्ग संचालकांची जबाबदारी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिकवणी वर्ग संचालकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे वय किती आहे व ते कोणती दुचाकी चालविणार आहेत याची माहिती स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र घ्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. या आदेशामुळे शिकवणी वर्गांची जबाबदारी वाढली आहे.अल्पवयीनांना ५० सीसीवरील दुचाकी चालविण्याची परवानगी नाही. परंतु, हा नियम कागदावरच आहे. अल्पवयीन मुले-मुली सर्रास शक्तिशाली दुचाकी चालवीत आहेत. २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलाने शक्तिशाली दुचाकी निष्काळजीपणे चालवून दुसऱ्याचा अपघात केला होता. न्यायालयाने त्या घटनेची दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली. ही याचिका बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली होती. दरम्यान, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरील आदेश दिला.याशिवाय न्यायालयाने शहरातील पार्किंग, वाहतूक कोंडी व अन्य समस्यांवर आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याची बाब लक्षात घेता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीला फटकारले. समिती बैठका घेऊन समस्या सोडविण्यावर विविध निर्णय घेते, पण त्यावर अंमलबजावणी केली जात नाही. निर्णय कागदावरच राहतात, असे मत न्यायालयाने व्यक्त करून आतापर्यंतच्या बैठकांमध्ये सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांवर सहा आठवड्यांत अंमलबजावणी करण्याचा आदेश उपसमितीला दिला. न्यायालयाने अन्य एका प्रकरणात शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्या समितीने स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली आहे. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय