शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:45 IST

नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असून नागरी सुविधाही स्मार्ट करण्यावर भर आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट होत आहे, मेट्रो येत आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बस, इलेक्ट्रिक टॅक्सी, ई-रिक्षा अशा अनेक पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सोई उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा आणि महापालिका अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत करावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

ठळक मुद्देमहापौर नंदा जिचकार यांचे नागरिकांना आवाहन : स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असून नागरी सुविधाही स्मार्ट करण्यावर भर आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट होत आहे, मेट्रो येत आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बस, इलेक्ट्रिक टॅक्सी, ई-रिक्षा अशा अनेक पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सोई उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा आणि महापालिका अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत करावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त सिव्हिल लाईन्स महापालिका मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, एनईएसएलचे संचालक डॉ. आर. झेड सिद्दिकी उपस्थित होते.तत्पूर्वी महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अग्निशमन पथकाच्या पथसंचालनाचे महापौर, आयुक्त यांच्यासह मान्यवरांनी निरीक्षण केले. पथकाची मानवंदना स्वीकारली. संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले. यावेळी उपायुक्त राजेश मोहिते, डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगीनवार, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रभाग १५ ला ५० लाखांचा पुरस्कारमहाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डाची स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यात धरमपेठ झोनमधील प्रभाग क्र. १५ ला ५० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला. द्वितीय क्रमांक धंतोली झोनअंतर्गत येणाºया प्रभाग क्र. १७ ला जाहीर झाला असून तो ३५ लाख रुपयांचा आहे. १५ लाख रुपयांचा तृतीय क्रमांक धंतोली झोनमधीलच प्रभाग क्र. ३३ व प्रभाग क्र. ३५ ला विभागून जाहीर करण्यात आला.फिरत्या रुग्णवाहिकेचे लोकार्पणस्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत फिरत्या रुग्णवाहिकेचे महापौराच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आरोग्य अधिकारी (मे.) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाIndependence Dayस्वातंत्र्य दिवस