शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यांक आयोगाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्या; आराफत शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 10:43 IST

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपला उत्कर्ष साधावा. त्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोग विद्यार्थ्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आराफत शेख यांनी सांगितले.

ठळक मुद्दे१५ कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासन अल्पसंख्याकांच्या विकासासाठी प्रयत्नरत असून विविध योजना राबवित आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांनी मौलाना आझाद शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊन देशासह परदेशातही उच्च शिक्षण घ्यावे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपला उत्कर्ष साधावा. त्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोग विद्यार्थ्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आराफत शेख यांनी सांगितले.नागपूर जिल्ह्यातील शासनाच्या विविध विभागांकडून अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आज छत्रपती सभागृहात आढावा घेतला. त्यांच्या ‘३६ जिल्हे, ३६ दिवस’ या राज्यव्यापी दौºयातील आज नागपूर जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी अराफात शेख यांनी राज्य शासनाच्या १५ कलमी कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार, कौशल्य विकास योजना, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, शिष्यवृत्ती योजना, मुलींसाठी वसतिगृह उपलब्ध करून देण्यात आहे. तसेच अल्पसंख्याक समाजाच्या युवकांनी विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग सुरू करावेत आणि स्वत: व समाजाचा विकास करावा, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.राज्य अल्पसंख्याक विकास विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत निधी वितरित केलेल्या संस्था, शाळांना पायाभूत सुविधा योजनेंतर्गत निधी वितरण केलेल्या संस्था, ग्रामीण तसेच शहरी विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी तसेच २०१८-१९ मधील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना आणि नई रोशनी अल्पसंख्याक योजना सन २०१८-१९च्या योजनांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी नागपूर जिल्ह्यात ४८ प्रस्ताव प्राप्त झाले असून, समितीकडून त्याच्या छाननीची कार्यवाही सुरू आहे. अल्पसंख्याक बहुल ग्रामीण शाळांना, खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अपंग विद्यार्थ्यांच्या शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्याबाबत योजनेंतर्गत चालू वर्षांसाठी १९ प्रस्ताव तयार करण्यात आलेआहेत.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती