शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: January 20, 2017 02:30 IST

नोटाबंदी विरोधात बुधवारी नागपूर येथे रिझर्व्ह बँकेसमोर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या

राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : पोलिसांनी बेजबाबदारपणा दाखविलानागपूर : नोटाबंदी विरोधात बुधवारी नागपूर येथे रिझर्व्ह बँकेसमोर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेसचे आंदोलन अतिशय शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बँंकेत गेले असता बाहेर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर प्रचंड लाठीमार केला. दडपशाही पद्धतीने आंदोलन पांगविण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारणा केली असता त्यांनाही मारहाण करून ताब्यात घेण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाला त्याच ठिकाणी पुन्हा ठिय्या आंदोलन करावे लागले. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करून परिस्थिती गंभीर करण्याच्या या प्रकाराची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी पत्रात केली आहे.