शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू वाढतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:22 IST

उपराजधानीत पावसाचा जोर वाढताच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सोमवारी सहा रुग्ण पॉझिटीव्ह आले असून दोन महिलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी सहा रुग्ण : दोन महिलांचा मृत्यू , गणेशोत्सवावर सावट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत पावसाचा जोर वाढताच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सोमवारी सहा रुग्ण पॉझिटीव्ह आले असून दोन महिलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गणेशोत्सवावर स्वाईन फ्लूच्या सावटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुंदा उमाठे (४६) व निर्मला गणवीर (३६) असे मृत महिलांचे नाव आहे.विघ्नहर्त्याच्या आगमनाने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना स्वाईन फ्लूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे. सोमवारी पॉझिटीव्ह आलेल्या सहा रुग्णांमध्ये दोन पुरुष तर चार महिलांचा समावेश आहे. सध्या या सर्वांवर खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, २३ आॅगस्ट रोजी कुंदा उमाठे तर सोमवारी निर्मला गणवीर यांच्या झालेल्या मृत्यूने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्या-त्या वसाहतींमध्ये आवश्यक उपाययोजनांवर भर देत आहे.पाच वर्षाची चिमुकलीही पॉझिटीव्हइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीचाही स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह आला आहे. तूर्तास तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.२३ रुग्णांचा मृत्यूस्वाईन फ्लूची दहशत कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. नागपूर विभागात १४७ रुग्ण आढळून आले असून मृताची नोंद ३८ वर गेली आहे. उपराजधानीत आतापर्यंत स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या १०९ वर पोहचली आहे तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.