शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूने चिमुकलीचा मृत्यू

By admin | Updated: April 22, 2017 02:56 IST

वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू रुग्ण व मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

मेडिकलमध्ये होते उपचार सुरू : वडिलांचा हलगर्जीपणाचा आरोप नागपूर : वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू रुग्ण व मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परिणामी, सामान्यांमध्ये या आजाराला घेऊन दशहतीचे वातावरण निर्माण होत आहे. बुधवारी स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आलेल्या एक वर्षीय चिमुकलीचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाल्याने नागपूर विभागात मृत्यूची संख्या १४वर गेली आहे. मृताच्या वडिलाने उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला आहे. सावनेर येथील रहिवासी आराध्या बाबा प्रधान (१) असे मृताचे नाव आहे. आराध्याचे वडील बाबा प्रधान यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आराध्याचा ताप फार वाढल्याने ६ एप्रिल रोजी मेडिकलच्या बालरोग विभागात भरती करण्यात आले. ताप कमी होत नसल्याने तिला १५ एप्रिल रोजी अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रकृती सुधारत होती. याच दरम्यान तिच्या घशाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. १९ एप्रिल रोजी नमुन्याचा अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आला. प्रकृती पूर्णत: सुधारली नसताना अचानक गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास व्हेन्टिलेटर काढले व अतिदक्षता विभागातून स्वाईन फ्लूच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये घेऊन जाण्यास सांगितले. तिथे व्हेन्टिलेटर न लावता सामान्य आॅक्सिजनवर ठेवण्यात आले. शुक्रवारी पहाटे ३ वाजता अचानक प्रकृती खालवली. त्यावेळी एकही वरिष्ठ डॉक्टर वॉर्डात नव्हता. शिकाऊ डॉक्टर होते. वॉर्डाच्या सामोर अतिदक्षता विभाग असताना तिथे मुलीला नेले नाही. व्हेन्टिलेटरही लावले नाही. यातच सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणाचा तक्रार मेडिकलच्या अधिष्ठात्यांकडे करणार आहे, असेही प्रधान म्हणाले. (प्रतिनिधी)