शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सातारा आणि सांगलीहून आला अमरावतीत ‘स्वाईन फ्लू’

By admin | Updated: August 10, 2014 01:24 IST

‘स्वाईन फ्लू’ आजाराने शहराच्या नमुना परिसरातील विनोद गणोरकर यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मृताने सातारा व सांगली भागात केलेल्या

प्रवासात लागण : गणोरकरांची दोन्ही फुफ्फुसे झाली होती निकामीवैभव बाबरेकर - अमरावती‘स्वाईन फ्लू’ आजाराने शहराच्या नमुना परिसरातील विनोद गणोरकर यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मृताने सातारा व सांगली भागात केलेल्या प्रवासातून हा भयंकर आजार अमरावती शहरापर्यंत आला असावा, असा अंदाज अमरावती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी एस.आर.सोनी यांनी सांगितले.नमुना परिसरातील तिसऱ्या क्रमांकाच्या गल्लीतील रहिवासी मृत विनोद गणोरकर हे कुरिअर सर्व्हीसमध्ये कार्यरत होते. या कामानिमित्त त्यांना राज्यभर प्रवास करावा लागत असे. १२ जुलै रोजी विनोद गणोरकर सातारा जिल्ह्यातील गोंडवणे या धार्मिकस्थळी त्यांच्या गुरूंच्या दर्शनासाठी गेले होते. त्याठिकाणी प्रचंड गर्दी होती. या गर्दीतून कसरत करीत त्यांनी गुरूंचे दर्शन घेतले. त्यानंतर दोन दिवसांनी ते अमरावतीत परतले. त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांनतर विनोद गणोरकर सांगली येथे त्यांच्या मुलाच्या भेटीसाठी गेले. यावेळी त्यांनी वाशिम- सांगली हा प्रवास एका खासगी ट्रॅव्हल्समधून केला. ही गाडी वातानुकूलित असल्याने त्यांना सर्दीचा त्रास जाणवू लागला. सांगलीहून अमरावतीला परतल्यानंतर मात्र त्यांची त्यांची सर्दी अधिकच वाढली. सर्दीसाठी त्यांनी नमुना परिसरातील त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले. परंतु त्यांची प्रकृती सुधारली नाही. त्यामुळे त्यांनी शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू केले. एक वर्षापूर्वी याच रूग्णालयात त्यांच्यावर निमोनियासाठी उपचार झाले होते. एका वर्षा आधी विनोद गणोरकर यांना निमोनिया झाला होता. या खासगी रूग्णालयातील उपचारांनाही विनोद गणोरकर प्रतिसाद देत नसल्याने येथील डॉक्टरांनी त्यांच्या छातीचा एक्स-रे काढला. त्यामध्ये विनोद यांच्या फुफ्फुसाच्या एका बाजुला निमोनियाचा प्रादुर्भाव आढळून आला. फुफ्फुसांचा त्रास वाढल्याने त्यांच्या श्वासोच्छवासात अडथळे येऊ लागल्याने त्यांना नागपूरला हलविण्याचा सल्ला येथील खासगी डॉक्टरांनी दिला. दुसऱ्या दिवशी लगेच विनोद यांना नागपूर येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत विनोद यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी होऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. तेथील डॉक्टरांनी विनोद यांना ‘टॅमी फ्लू’ देणे सुरु केले होते. परंतु उपचार सुरू असतानाच गुरूवारी विनोद गणोरकर यांचा मृत्यू झाला. विनोद यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता विनोद गणोरकर ‘स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह’ असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचे वृत्त प्रकाशित होताच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग आला आहे.