शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

ठगबाज गोपाल कोंडावार गजाआड : पोलिसांनी मुंबईत पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 23:08 IST

Swindler Gopal Kondawar arrested कंपनीच्या मालमत्तेच्या विक्रीचा करार करून ७० लाख रुपये घेतल्यानंतर ती जागा परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक करणारा ठगबाज आरोपी गोपाल लक्ष्मणराव कोंडावार (वय ५५, रा. रामदासपेठ) याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तो मुंबईत दडून बसला होता.

ठळक मुद्दे७० लाख रुपये घेऊन कंपनीची मालमत्ता दुसऱ्यांना विकली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कंपनीच्या मालमत्तेच्या विक्रीचा करार करून ७० लाख रुपये घेतल्यानंतर ती जागा परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक करणारा ठगबाज आरोपी गोपाल लक्ष्मणराव कोंडावार (वय ५५, रा. रामदासपेठ) याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तो मुंबईत दडून बसला होता.

मनमोहन तिलकराज हिंगल (वय ६४) असे या प्रकरणातील तक्रारकर्त्यांचे नाव आहे. ते रामदासपेठेत राहतात. आरोपी कोंडावारने त्याच्या युनिक ऍग्रो प्रोसेसर इंडिया कंपनीची अमरावती मार्गावरील मालमत्ता विकण्याचा करार २०१२ मध्ये हिंगल यांच्यासोबत केला होता. कंपनीच्या संचालक मंडळाचा ठराव करूनच ही मालमत्ता विकत असल्याचे कोंडावारने हिंगल यांना सांगितले होते आणि त्या ठरावाची प्रतही त्यावेळी हिंगल यांना दिली होती. त्यावर विश्वास ठेवून हिंगल यांनी कोंडावारला ७० लाख रुपये चेकने दिले. ही रक्कम घेतल्यानंतर आरोपी कोंडावारने त्याच्या कंपनीची मालमत्ता परस्पर दुसऱ्याला विकली. या वादग्रस्त व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कोंडावारला बरेचदा विचारणा केली; मात्र ९ वर्षापासून कोंडावार त्यासंबंधाने असंबंध माहिती देऊन फिर्यादीला टाळत होता. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रदीर्घ चौकशी झाल्यानंतर या प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वी अंबाझरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आरोपी कोंडावारचा तेव्हापासून शोध घेत होते. तो मुंबईत दडून असल्याचे कळताच तेथे जाऊन पोलिसांनी त्याला १० मे रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा १५ मे पर्यंत पीसीआर मिळवण्यात आला.

अनेकांची फसवणूक

अशाप्रकारे कोंडावारने अनेकांना लाखोंची टोपी घातली आहे. त्याच्याविरुद्ध नागपूर शहरात ५, तर ग्रामीणमध्ये एक असे ६ गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Arrestअटकfraudधोकेबाजी