शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

स्विमिंग टँकमध्ये बुडाली विद्यार्थिनी

By admin | Updated: September 11, 2015 03:20 IST

मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह संशयास्पदरीत्या स्विमिंग टँकमध्ये आढळला.

बीटीपी फार्महाऊसमधील घटना : बर्थडे पार्टी भोवलीनागपूर : मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह संशयास्पदरीत्या स्विमिंग टँकमध्ये आढळला. कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोंडाखैरी शिवारातील बीपीपी फार्महाऊसमध्ये ही खळबळजनक घटना घडली. यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. फेटरी सिल्लोरी मार्गावर तोंडाखैरी शिवारात मजहर शेखचा हा फार्महाऊस आहे. येथे नागपूरच्या रामबाग कॉलनीत राहणाऱ्या शिवा सुभाष यादवची बर्थडे पार्टी होती. त्यासाठी ७ मुली आणि २१ मुले पार्टीसाठी पोहोचली. दुपारी १.३० वाजता पार्टी सुरू झाली. बहुतांश मुले-मुली दारूच्या नशेत झिंगू लागले. नाचगाणे, धांगडधिंगा झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता जेवणासाठी एकमेकांना बोलावणे सुरू झाले. काही जण जेवणाच्या टेबलकडे गेले. यातील पूर्वा संजय हेडाऊ (वय १८) ही दिसत नसल्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. फार्महाऊसमधील सर्व रूम आणि कानाकोपरा शोधल्यानंतर आजूबाजूची झाडीझुडपातही तिला शोधण्यात आले. पूर्वा कुठेच दिसली नाही. अनेकांची नशा उतरलीनागपूर : पूर्वाशी स्नेह जपणाऱ्या काही मित्रांनी स्विमिंग पूलमध्ये उतरून तिचा कानोसा घेतला. त्यानंतर सारेच हादरले. पूर्वाचा मृतदेह स्विमिंग टँकच्या तळाशी पडून होता. ते पाहून अनेकांची नशा उतरली. काहींनी आहे त्याच अवस्थेत तेथून पळ काढला तर, काहींनी पोलिसांना कळविले. त्यानुसार कळमेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. पूर्वाच्या मृत्यूबाबत कुणीच काही बोलायला तयार नव्हते. त्यामुळे पूर्वाच्या मृत्यूने संशयकल्लोळ जास्तच वाढवला. पोलिसांनी पंचनामा करून विद्यार्थ्यांचे बयान नोंदविले. त्यानंतर पूर्वाचा मृतदेह रुग्णालयात रवाना करण्यात आला. (प्रतिनिधी)आंटी कुठाय? ही धक्कादायक घटना घडल्यानंतर या फार्महाऊसवर महत्त्वाची भूमिका वठविणारी आंटी गायब झाली. नागपूरच्या सिराज शेखचे हे फार्महाऊस असून, येथे नको ते प्रकार चालतात, अशी चर्चा आहे. ‘आंटी‘च सर्व सुविधा उपलब्ध करून देते, त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते, असे पंचक्रोशीतील नागरिक सांगतात. गुरुवारची पार्टीही आंटीनेच मॅनेज करून दिली होती. त्यात सहभागी ७ मुली आणि २१ तरुण अशा एकूण २८ जणांकडून प्रत्येकी ६५० रुपये घेण्यात आले होते, असे समजते. सारेच संशयास्पद मृत पूर्वा ही संताजी महाविद्यालयात बीएस्सी मायक्रोलॉजीच्या प्रथम वर्षाला शिकत होती, असे समजते. तिला या पार्टीत नेणाऱ्यांनी तिच्याकडे कसे दुर्लक्ष हा प्रश्न संशय वाढविणारा आहे. ती पाण्यात बुडून असेपर्यंत कुणालाच कसे दिसले नाही, तिला शोधताना काहींची भूमिका संशयास्पद होती, त्यांनी पूर्वाचा घात केला काय, बाजूच्या रूममध्ये पार्टीतील काही तरुणी आणि काही तरुण नको ते कृत्य करीत होते, त्यांना या प्रकाराची कशी चाहुल लागली नाही, असे अनेक प्रश्न चर्चेला आले असून, पूर्वाचा मृत्यू अपघाताने झाला की घातपाताने, त्याबाबतही उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.