शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

नरखेड नगर परिषदेवर जप्तीचे सावट

By admin | Updated: June 24, 2014 00:55 IST

स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीत केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एक टक्क्याऐवजी

घरकूल बांधकाम व प्रकल्प अहवालप्रकरणनरखेड : स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीत केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एक टक्क्याऐवजी तीन टक्के रक्कम देण्याचा ठराव पारित करण्यात आला. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला आणि हा वाद न्यायालयात पोहोचला. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशान्वये नरखेड नगर परिषदेवर जप्तीचे सावट निर्माण झाले असून, ही जप्ती मंगळवारी करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहे.एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार योजनेंतर्गत नरखेड नगर परिषदेच्या हद्दीत पहिल्या टप्प्यात ६८० घरकुलांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. सदर घरकुलांच्या बांधकामाचा कंत्राट अकोला येथील रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आला. या योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या घरकूल बांधकामाचा प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) तयार करण्याचे कामही याच ट्रस्टला देण्यात आले. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील घरकुलांच्या बांधकामासाठी ६५.३१२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्पाच्या एकूण किमतीपैकी एक टक्का किंवा ४० लाख रुपये यापैकी कमी असलेली रक्कम अहवाल तयार करण्यासाठी देय असल्याचा नियम आहे. नगर परिषदेच्या २९ जानेवारी २००९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या नियमाला डावलून एक टक्क्याऐवजी तीन टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेऊन ठाराव पारित करण्यात आला. शिवाय, प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी देय असलेली रक्कम २.९९ टक्के दराने देण्याचा संबंधित ट्रस्ट सोबत करारनामाही करण्यात आला. एक टक्क्यावरून तीन टक्क्यांना मंजुरी देण्याला १४ नगरसेवक सहमत होते. त्यानंतर २९ एप्रिल २०११ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक-१२ अन्वये पार्ट पेमेन्ट बिल म्हणून मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून आय.एच.एस.डी.पी. फंडातून ४१ लाख ८७ हजार २१ रुपये आणि नगर परिषद फंडातून ३० लाख रुपये असे एकूण ७१ लाख ८७ हजार २१ रुपये १७ फेब्रुवारी २०१३ रोजी रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आले.उर्वरित १ कोटी २४ लाख ६ हजार ९७९ रुपये देण्यासाठी १३ मार्च २०१३ रोजी पालिकेत विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यात विद्यमान पदाधिकारी व नगरसेवकांनी एक ते दीड लाख रुपयांच्या स्वार्थासाठी नगर परिषदेच्या विशेष सभेत विषय क्रमांक-१ अंतर्गत कंत्राटदार ट्रस्टला देण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोप नगरसेवक अभिजित गुप्ता यांनी केला. या ठरावावर १७ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने तसेच म्हाडाचे पत्रक समोर आल्याने कंत्राटदारांची देयके थांबविण्यात आलीत. त्यामुळे कंत्राटदाराने जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली. यावर निर्णय देताना न्यायालयाने नगर परिषदेच्या संपत्तीचे जप्तीचे आदेश जारी केले. परिणामी, या जप्तीकडे नरखेडवासीयांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)