शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

शिवीगाळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रोत्साहन नव्हे; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 18:32 IST

Nagpur News सार्वजनिकरित्या अपमानास्पद शिवीगाळ करणे म्हणजे, आत्महत्येस प्रोत्साहन देणे किंवा मदत करणे नव्हे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून आरोपींविरुद्धचा वादग्रस्त गुन्हा रद्द केला.

ठळक मुद्दे वादग्रस्त गुन्हा रद्द केला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सार्वजनिकरित्या अपमानास्पद शिवीगाळ करणे म्हणजे, आत्महत्येस प्रोत्साहन देणे किंवा मदत करणे नव्हे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून आरोपींविरुद्धचा वादग्रस्त गुन्हा रद्द केला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. (Swearing is not an incentive to commit suicide; High Court observation)

आरोपींमध्ये विजय चव्हाण व इतर चार व्यक्तींचा समावेश होता. ते सर्व यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील रहिवासी आहेत. जेता राठोड यांनी आत्महत्या केल्यामुळे ३ मार्च २०२१ रोजी पुसद ग्रामीण पोलिसांनी या आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदवला होता. तो गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका मंजूर करण्यात आली.

जेता राठोड यांनी आत्महत्या करावी, यासाठी आरोपींनी त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन दिले वा मदत केली, याचे ठोस पुरावे न्यायालयाला आढळून आले नाहीत. आरोपी व राठोडमध्ये शेतजमिनीविषयी वाद होता. त्यावरून त्यांचे वारंवार भांडण होत होते. तो वाद सामंजस्याने मिटविण्यासाठी पंचायतीसमक्ष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आरोपींनी राठोडला अवमानजनक शिवीगाळ केली. परिणामी, राठोडने विष प्राशन करून आत्महत्या केली, अशी पोलीस तक्रार होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय