शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष करणाऱ्या महिलांच्या पाठीशी स्वयंपूर्णा उभी राहणार : कांचन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 22:58 IST

कष्ट आणि संघर्षाची तयारी ठेवा उद्योजिका आणि यशस्वी स्त्री म्हणून तुम्हाला बळ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन स्वयंपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्दे ‘स्वयंपूर्णा एक्स्पो २०२०’चे उद्घाटन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : प्रत्येक स्त्रीमध्ये उद्यमशील शक्ती आहे. स्वत:ला उद्योजिका म्हणून ती नक्कीच सिद्ध करू शकते, परंतु केवळ संधीची वाट बघते. स्वयंपूर्णा संस्थेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असून, तुम्ही कष्ट आणि संघर्षाची तयारी ठेवा उद्योजिका आणि यशस्वी स्त्री म्हणून तुम्हाला बळ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन स्वयंपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी केले.केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वयंपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने लक्ष्मीनगर येथील जेरिल लॉन्स येथे ‘स्वयंपूर्णा एक्स्पो २०२०’चे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर एमएसएमईचे निदेशक प्रशांत पार्लेवार, स्वयंपूर्णाच्या कार्यवाह विजया भुसारी आणि उद्योजिका विशाखा राव, राहुल मिश्रा, विजयश्री खानोरकर उपस्थित होते.कांचन गडकरी पुढे म्हणाल्या, अनेक कुटुंबांना आर्थिक आधार देण्याकरिता संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबविले जातात. सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देण्याचेसुद्धा सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, सामाजिक प्रतिष्ठा महिलांना मिळाली पाहिजे आणि यासाठी ती उद्योजिका झाली पाहिजे त्यादृष्टीने समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी पुढे यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.प्रशांत पार्लेवार यांनी एमएसएमईच्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांना विशेष सुविधा शासनाकडे असून, यशस्वी महिलांना व दर्जेदार उत्पादनांना आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. या तीन दिवसीय प्रदर्शनात विविध योजनांची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार असून, कर्जविषयक माहितीही देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. विशाखा राव यांनी उद्योजक म्हणून त्यांचे अनुभव सांगितले. संचालन स्नेहल अलोणे यांनी केले. श्रुती बाईवार यांनी ध्येयगीत सादर केले. स्वयंपूर्णा संस्थेच्या नेहा लघाटे, नीलिमा बावणे, नीलिमा गढीकर, रेखा सप्तर्षी, रश्मी पोफळी,ज्योत्स्ना डहाके आदींनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :Womenमहिलाbusinessव्यवसाय