शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महुआ मोइत्रांच्या हल्ल्याने स्वपन दासगुप्ता घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST

विधानसभेसाठी अर्जाआधी राज्यसभेचा राजीनामा लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : आक्रमक भाषणांसाठी देशभर चर्चेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा ...

विधानसभेसाठी अर्जाआधी राज्यसभेचा राजीनामा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : आक्रमक भाषणांसाठी देशभर चर्चेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी सोमवारी रात्री राज्यसभेतील राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्यत्वाबाबतची एक दुर्लक्षित तरतूद समोर आणली. त्याविषयी नामवंत पत्रकार, पद्मभूषण पुरस्कृत राज्यसभेचे सदस्य स्वपन दासगुप्ता यांच्यावर ट्विटद्वारे हल्ला चढविला. परिणामी, तारकेश्वर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

वृत्तवाहिन्यांशी बोलताना मात्र श्रीमती मोइत्रा यांच्या ट्विटमुळे आपण राजीनामा देत नसल्याचा खुलासा दासगुप्ता यांनी केला आहे. राज्यघटनेच्या १० व्या परिच्छेदानुसार राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामनिर्देशित केलेले सदस्य शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांपर्यंतच एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारू शकतात. त्यानंतर त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले तर राज्यसभेचे खासदार म्हणून ते अपात्र ठरतात. एरव्ही कोणाच्याही लक्षात नसलेली ही तरतूद श्रीमती महुआ मोइत्रा यांनी सोमवारी रात्री ट्विटद्वारे समोर आणली. राज्यसभेचा राजीनामा न देता विधानसभेसाठी अर्ज दाखल केला तर स्वपन दासगुप्ता यांचा तो अर्ज अवैध ठरणार नाही, पण राज्यसभेतून अपात्र ठरतील, असा परिणामही सांगितला. परिणामी, मंगळवारी सकाळी घाईघाईने दासगुप्ता यांनी राजीनामा सादर केला व सोबतच उद्याच तो मंजूर करावा, जेणेकरून विधानसभेसाठी अर्ज भरता येईल, अशी विनंती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना केली आहे.

भाजपने केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांच्यासह ज्या चार खासदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे, त्यात राष्ट्रपती नामनिर्देशित स्वपन दासगुप्ता, तसेच लॉकेट चटर्जी व निशित प्रामाणिक यांचा समावेश आहे.