शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वामिनाथन आयोग व संपूर्ण कर्जमुक्तीचा नारा

By admin | Updated: October 4, 2016 06:17 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने देशपांडे सभागृहात आयोजित दोन दिवसीय विदर्भाच्या प्रतिरूप

विदर्भाची प्रतिरूप विधानसभा : विरोधकांची आक्रमक भूमिका, सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने देशपांडे सभागृहात आयोजित दोन दिवसीय विदर्भाच्या प्रतिरूप विधानसभेला सोमवारपासून सुरुवात झाली. विधानसभेच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाने जोरदारपणे लावून धरली. यावरून सभागृहात गोंधळ उडाला. कृषिमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर येत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. संपूर्ण दिवसभरात सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. सोमवारी दुपारी १२.४५ वाजता सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. राज्यपाल मधुकरराव निसर यांना मुख्य न्यायाधीशांनी शपथ दिली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष मोरेश्वर टेंबुर्डे यांनाही शपथ देण्यात आली. अध्यक्षांनी मुख्यमंत्री अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ व आमदारांना शपथ दिली. सर्वप्रथम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुख्यमंत्री अ‍ॅड. चटप यांनी शोकप्रस्ताव सादर केला. सभागृहाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनाही श्रद्धांजली अर्पण केली. राज्यपालांचे अभिभाषणापर्यंत कामकाज सुरळीत चालले. प्रश्नोत्तराच्या तास सुरू झाला. उद्योग विभागाशी संबधित प्रश्न पुकारण्यात आला. कृषी विभागाच्या संबधित प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले. स्वामिनाथन आयोग कधी लागू करता असा जाब विचारत संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करू लागले. विरोधकांचे आक्रमक रूप पाहून कृषिमंत्र्यानी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, परंतु समाधान होऊ शकले नाही. विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान विरोधी पक्षाच्या घोषणाबाजीत शासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. परंतु त्याने फारसा फरक पडला नाही.(प्रतिनिधी)