शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

महिला ‘शेफ’चा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: June 15, 2017 02:14 IST

वर्धा रोडवरील हॉटेल प्राईडमध्ये थांबलेल्या एका खासगी कंपनीतील तरुण महिला शेफचा संशयास्पद मृत्यू झाला.

हॉटेलच्या खोलीत सापडला मृतदेह : श्वसननलिका झाली होती ब्लॉक, पोस्टमार्टममध्ये खुलासा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्धा रोडवरील हॉटेल प्राईडमध्ये थांबलेल्या एका खासगी कंपनीतील तरुण महिला शेफचा संशयास्पद मृत्यू झाला. हॉटेलच्या खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. अलका प्रभाकर वलनजू (२८) रा. खारगर रोड, पनवेल, जि. रायगड असे मृताचे नाव आहे. अल्का ही कंपनीकडून ‘डेमो’ सादर करण्यासाठी मंगळवारी नागपुरात आली होती. हॉटेलमधील खोली क्रमांक ११८ मध्ये ती थांबली होती. मंगळवारी सकाळी एका बेकरीमध्ये तिने डेमो दाखविला. सायंकाळी हॉटेलमध्ये परत आली. रात्री हॉटेलमध्येच जेवण केले. रात्री १ वाजता घरच्यांसोबत फोनवर बोलल्यानंतर ती झोपली. बुधवारी सकाळी तिच्या भावी वराने फोन केला. परंतु खूप वेळपर्यंत तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने हॉटेलच्या रिसेप्शनवर फोन करून याबाबत कळविले. तसेच खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खूप आवाज दिला. बेल वाजवली. परंतु कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सोनेगाव पोलिसांना सूचना दिली. पोलीस आल्यावर डुप्लिकेट चावीने खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा बेडवर अलका मृतावस्थेत पडली होती. तिने उलटी केल्याचेही दिसून येत होते. हॉटेलमध्येच डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. यानंतर तिच्या कुटुंबीयांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह मेडिकलला पाठवला. पोस्टमार्टममध्ये श्वसननलिका ‘ब्लॉक ’ झाल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. सायंकाळी अलकाचे कुटुंबीय सुद्धा नागपूरला पोहोचले. त्यांच्याकडे अलकाचा मृतदेह सोपवण्यात आला. अलका मिरगीच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच तिचे साक्षगंध झाले होते. तिचे वडील अधिकारी आहेत. कुटुंबात आई-वडील आणि लहान भाऊ आहे. कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूबाबत कुठलाही संशय व्यक्त केलेला नाही. खोलीतही मृत्यूशी संबंधित कुठलेही पुरावे सापडले नाही. अलका यापूर्वी सुद्धा नागपूला येऊन गेली होती. पीएसआय साजीद अहमद यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.