शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पीएफ जमा करण्याच्या आदेशावर स्थगिती

By admin | Updated: November 5, 2016 02:59 IST

प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ यांनी महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे १५ कोटी ६७ लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता.

मनपाला हायकोर्टाचा दिलासा : सक्तीची कारवाई करण्यास मनाईनागपूर : प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ यांनी महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे १५ कोटी ६७ लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी या वादग्रस्त आदेशावर अंतरिम स्थगिती दिली. तसेच पुढील तारखेपर्यंत मनपाच्या खात्यातून संबंधित रक्कम स्थानांतरित करण्याबाबत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश दिले. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ यांच्या वादग्रस्त आदेशाविरुद्ध महानगरपालिकेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर अवकाशकालीन न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ४,५०० सफाई कर्मचाऱ्यांचा जानेवारी -२०११ ते आॅगस्ट-२०१३ या कालावधीतील १५ कोटी ६७ लाख रुपये भविष्य निर्वाह निधी महानगरपालिकेकडे थकीत आहे, असे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांचे म्हणणे आहे. यामुळे वादग्रस्त आदेश जारी करून ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करण्याचे निर्देश मनपाला देण्यात आले होते.महानगरपालिकेत बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. या शाखेत मनपाचे खाते आहे. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी शुक्रवारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना कार्यालयात बोलावले होते. यामुळे बँकेतील खाते गोठवून संबंधित रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात स्थानांतरित केली जाण्याची शक्यता पाहता मनपाने उच्च न्यायालयात दाद मागितली. प्रकरणावर दिवाळीच्या सुट्यांनंतर पुढील सुनावणी होईल. महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)असे आहे प्रकरणमनपातील अस्थायी कर्मचाऱ्यांना जानेवारी-२०११ सालापासून भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करणे आवश्यक होते. परंतु, मनपाने २०१३ पासून योजना लागू करण्याची भूमिका घेऊन जानेवारी-२०११ पासून भविष्य निर्वाह निधी भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने यापूर्वीही मनपाची बँक खाती गोठविली होती. त्यावेळी अस्थायी कर्मचाऱ्यांना जानेवारी-२०११ पासून योजना लागू करण्याची ग्वाही मनपातर्फे देण्यात आली होती. मनपाने ही ग्वाही पाळली नाही. परिणामी गेल्या बुधवारी वादग्रस्त आदेश जारी करण्यात आला.मनपाची आर्थिक परिस्थिती खराबराज्य शासनाने एलबीटी रद्द केला आहे. परंतु, या मोबदल्यात मनपाला शासनाकडून अपेक्षित अनुदान प्राप्त होत नाही. यामुळे मनपाची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. याचा विकास कामांना फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी जमा न करण्याचेही हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.