शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा घोटाळ्यात मनपाचे आरोग्य उपसंचालक निलंबित

By admin | Updated: May 16, 2017 01:59 IST

महापालिका व मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट प्रा.लि. यांच्यात शहरातील कचरा संकलन व त्याची वाहतूक करण्यासंदर्भात करार करण्यात आला होता.

डॉ. मिलिंद गणवीर यांना दणका : स्थायी समितीचे निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका व मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट प्रा.लि. यांच्यात शहरातील कचरा संकलन व त्याची वाहतूक करण्यासंदर्भात करार करण्यात आला होता. परंतु स्थायी समिती व सभागृहाची मंजुरी न घेता मूळ निविदेतील अटी व शर्ती यामध्ये परपस्पर बदल करण्यात आला. यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले. यावर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांची स्वाक्षरी असल्याने त्यांना निलंबित निर्देश सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले. सोबतच गणवीर यांची विभागीय चौकशी करून ते दोषी आढळून आल्यास सक्षम प्राधिकरणाने योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश आयुक्तांना देण्यात आले.शहरातील घरोघरी कचरा संकलन व त्याची वाहतूक करण्याबाबत २००८ मध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. अटी व शर्तीनुसार कनक कंपनीला हा कंत्राट देण्यात आला होता. मूळ निविदेतील अटी व शर्तीनुसार प्रति टन ४४९ रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला; यात दर तीन महिन्यांनी वाढ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा करार ३१ मे २०१८ पर्यंत लागू आहे. जानेवारी २०१६ ते मार्च २०१६ या तिमाहीकरिता प्रति टन १०३३.६८ रुपये दर देण्यात आला; वास्तविक प्रति टन ७७९.६६ रुपये देयके देणे अपेक्षित होते. एप्रिल २०१६ पासून प्रति टन १६०६.६९ दराची देयके सादर केली. प्रशासनाने प्रति टन १३०६. ८७ रुपये प्रति टन बिल देण्याला सहमती दर्शविली. अटी व शर्तीत परस्पर बदल करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस प्रशासनाने स्थायी समितीकडे केली होती. त्यानुसार समितीच्या बैठकीत मिलिंद गणवीर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली. निविदेतील अटी व शर्ती तसेच प्रशासनाने केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीतील परस्पर बदल यापैकी प्रशासनाने कशाशी बांधिल असावे, याबाबत महापालिकेने ज्येष्ठ विधी तज्ज्ञाकडून अभिमत घ्यावे. अभिमत प्राप्त झाल्यानंतर करारासंदर्भात आजवर सुरू असलेल्या सर्व चौकशी बंद करून महापालिका आयुक्तांनी स्वत: या प्रकरणाची चौकशी करून तीन महिन्यात अहवाल स्थायी समितीकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. शहरातील कचरा संकलन व त्याची वाहतूक करण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेसची सेवा तात्काळ बंद के ल्यास पर्यायी व्यवस्था नसल्याची माहिती जाधव यांनी दिली. प्रशासन ही सेवा देण्यास सक्षम आहे का, अशी विचारणा स्थायी समितीने प्रशासनाला केली होती. परंतु सेवा देण्यास प्रशासन सक्षम नसल्याचे सांगण्यात आले. चौकशी न करता निलंबनमहापालिकेतील अधिकाऱ्यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यापूर्वी या प्रकरणाची विभागीय चौकशी करणे गरजेचे आहे. यात दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले जाते. स्थायी समितीच्या आदेशानुसार आयुक्तांना निलंबनाचे आदेश जारी करावे लागतील. त्या तारखेपासून निलंबन गृहित धरण्यात येईल. परंतु अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याची संधी न देता थेट निलंबनाची कारवाई केल्याने अधिकाऱ्यांत नाराजी आहे. मनपा प्रशासन झोपेतच स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर शहर २० व्या क्रमांकावरून १३७ व्या क्रमांकावर घसरले आहे. यातून धडा घेत प्रशासन सक्रिय झाले आहे. स्थायी समितीनेही तत्परता दर्शवीत स्थायी समितीक डे जुलै २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीतील कंपनीचे वाढीव बिल रोखण्याचे निर्देश दिले आहे. वास्तविक करार झाला तेव्हा महापालिकेत भाजपाचीच सत्ता होती. स्थायी समितीचे तीन प्रश्नप्रश्न : नागपूरव्यतिरिक्त कनक आणखी कोणत्या शहरात सेवा देत आहे?उत्तर : मध्य प्रदेशातील जबलपूर, दिल्ली व गुजरातमधील काही शहरात सेवा देत आहे.दिल्लीत प्रति टन १८७५ तर जबलपूर येथे १४७० रुपये प्रति टन दराने कचरा उचलत आहे.प्रश्न : किमान वेतनानुसार कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते का?उत्तर : प्रशासनाने याबाबतचे आदेश जारी केले होते.प्रश्न : कनक ची सेवा बंद केल्यास महापालिकेची सेवा सक्षम आहे का? उत्तर : नाही, महापालिकेकडे सात हजार सफाई कर्मचारी आहेत. मात्र संकलन व वाहतुकीसाठी कर्मचारी नाही.