शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे घोषणापत्र देशद्रोही व फुटीरवाद्यांना खूष करणारे : सुषमा स्वराज यांचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:24 IST

काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणापत्रावर देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नागपुरात टीकास्त्र सोडले. काँग्रेसने जारी केलेले घोषणापत्र हे देशद्रोही व फुटीरवाद्यांना खूष करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून उत्तर दिले. तर राहुल गांधी देशद्रोहाला अपराध मानण्यास नकार देत आहेत. हाच एक चौकीदार व राजकुमार यांच्यातील फरक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. नागपुरात महिला मेळाव्यास संबोधित करताना त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देपाच वर्षांत विदेशात अडकलेल्या सव्वादोन लाख भारतीयांना परत आणले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणापत्रावर देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नागपुरात टीकास्त्र सोडले. काँग्रेसने जारी केलेले घोषणापत्र हे देशद्रोही व फुटीरवाद्यांना खूष करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून उत्तर दिले. तर राहुल गांधी देशद्रोहाला अपराध मानण्यास नकार देत आहेत. हाच एक चौकीदार व राजकुमार यांच्यातील फरक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. नागपुरात महिला मेळाव्यास संबोधित करताना त्या बोलत होत्या.जगनाडे चौकाजवळ आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी, भाजपाचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, ‘बरिएमं’च्या नेत्या अ‍ॅड.सुलेखा कुंभारे, महापौर नंदा जिचकार, संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी, माजी महापौर अर्चना डेहनकर, भाजपाच्या महिला आघाडी अध्यक्षा किर्तीदा अजमेरा प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्र सरकारने फुटीरवाद्यांच्या सवलती बंद केल्या. मात्र काँग्रेसचे लोक फुटीरवाद्यांशी चर्चा करताना दिसून येतात. मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जगापासून एकटे पाडण्याची संधी भारताकडे होती. मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने केवळ पत्र लिहून पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावी, असे म्हटले होते. मात्र उरी व पुलवामा येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सैन्याला पूर्ण मोकळीक दिली होती. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील समर्थन मिळविले. हा देशाचा सैन्यशक्ती व कूटनीतीचा विजय होता, असे स्वराज म्हणाल्या.विदेशात एखादा भारतीय संकटात असल्यावर ‘टिष्ट्वट’ करून कळवितो. त्यानंतर २४ तासात त्याला दिलासा मिळालेला असतो. मागील पाच वर्षांत आम्ही विदेशात अडकलेल्या २ लाख २६ हजार लोकांना सुरक्षित देशात परत आणले, असेदेखील सुषमा स्वराज यांनी सांगितले.‘बुद्धिस्ट सर्किट’मुळे देशाचे नाव उंचावले : गडकरीमाझ्या कार्यकाळात रस्तेबांधणीची कामे वेगाने झाली. विशेषत: ‘बुद्धिस्ट सर्किट’चे काम प्रगतीपथावर असल्याचे समाधान आहे. मी गौतम बुद्ध यांच्या विचारांनी प्रभावित झालो आहे. या कामामुळे दक्षिण पूर्व आशियामध्ये देशाचे नाव निश्चित उंचावले आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. कुठल्याही शहरात रोजगारनिर्मितीसाठी गुंतवणूक आणायची असेल तर तशा सुविधा निर्माण कराव्या लागतात. आम्हाला सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या रोजगाराची चिंता आहे व त्यादृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत. मात्र विरोधकांना केवळ स्वत:च्या मुलांच्याच रोजगाराची चिंता आहे, असेदखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या वक्तव्यांवर कुठलेही भाष्य करण्याचे टाळले. जे काहीच काम करत नाहीत ते वायफळ गोष्टी करतात असे ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSushma Swarajसुषमा स्वराजNitin Gadkariनितीन गडकरी