शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट कार राेडवर उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली आणि विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन उलटली. यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली आणि विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन उलटली. यात कारचालक जखमी झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील रिंगणाबाेडी शिवारात शुक्रवारी (दि. ३) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

नरेंद्र रामचंद्र करवते (४०, रा. अमरावती) असे जखमी कारचालकाचे नाव आहे. ते एमएच-३७/व्ही-६०६३ क्रमांकाच्या कारने अमरावतीहून काेंढाळीमार्गे नागपूरला जात हाेते. दरम्यान, रिंगणाबाेडी शिवारात त्यांचा अनियंत्रित कारवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळली. वेगामुळे ती कार नागपूरहून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर गेली व उलटली.

यात नरेंद्र करवते यांना दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व त्यांना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. सुदैवाने कार उलटली, त्यावेळी त्या लेनवर जवळपास काेणतेही वाहन नव्हते. कार उलटताच वेगात ट्रक अथवा अन्य वाहन आले असते तर अनर्थ झाला असता. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास हेड काॅन्स्टेबल सुनील बन्साेड करीत आहेत.