शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:26 IST

- ‘इंडस्ट्री ४.०’ उपक्रमांतर्गत विकास व उद्योजकता केंद्र : विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्याचा उद्देश नागपूर : काळाची गरज ओळखून आणि ...

- ‘इंडस्ट्री ४.०’ उपक्रमांतर्गत विकास व उद्योजकता केंद्र : विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्याचा उद्देश

नागपूर : काळाची गरज ओळखून आणि नवीन शैक्षणिक धोरणाला नजरेसमोर ठेवून देशातील नामांकित विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी त्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे. असेच एक नाव म्हणजे मध्य भारतातील शैक्षणिक संस्था सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी. सूर्योदय कॉलेजमध्ये ‘इंडस्ट्री ४.०’ हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. उद्घाटन केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी आ. सुधाकर कोहळे, नामांकित कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक जसे दीपक एन.जी. (दसाल्ट सिस्टीम), विनीत सेठ, नीरज देशपांडे (पीटीसी), डीसीएसचे प्रमुख सल्लागार अनुज शर्मा आणि राहुल नायडू उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, ही काळाची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष दीपक चाफले यांनी हा प्रकल्प म्हणजे स्वप्नपूर्ती होत असल्याचे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. व्ही. जी. अराजपुरे यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. केंद्राच्या व्यवस्थापकीय संचालक प्रा. रसिका चाफले यांनी केंद्राच्या उद्दिष्टांवर भर दिला. हा महाराष्ट्रातील पहिला आणि देशातील सहावा प्रकल्प आहे. ही विदर्भासाठी गौरवाची बाब आहे. ‘इंडस्ट्री ४.०’ या उपक्रमांतर्गत विकास आणि उद्योजकता केंद्र सुरू करण्यात आले आहे. जगद्विख्यात कंपन्या दसाल्ट सिस्टीम, मास्टर कॅम, पीटीसी या केंद्राला अद्ययावत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान पुरवित असून डीसीएस प्रशिक्षण देण्यासाठी सहभागी झाले आहेत. आयओटी आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

या केंद्राचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्याचा आहे. त्यामुळे ते रोजगार देणारे बनतील. ग्लोबल स्तरावरील तंत्रज्ञान लोकल पातळीवर उपयोगात येणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. ग्लोबल ते लोकल आणि पुन्हा लोकल ते ग्लोबल हा या केंद्राचा उद्देश आहे आणि हीच काळाची गरज आहे; त्यादिशेने सूर्योदय महाविद्यालयाने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. (वा.प्र.)