नागपूर : सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. महाविद्यालयीन जीवनातील सुवर्ण क्षणांना उजाळा देण्यासाठी हे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर महाविद्यालयीन सल्लागार समिती, माजी आमदार सुधाकर कोहळे, आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. चंद्रकांत रागीट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोल, अॅरो इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजीव केसकर, संस्थेचे अध्यक्ष दीपक चाफले, उपाध्यक्ष प्रमोद इंगळे, सचिव रणजित चाफले आणि प्राचार्य डॉ. अराजपुरे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांची समिती गठित करण्यात आली व सागर सावनसुखा याला अध्यक्ष मनोनित करण्यात आले. संचालन प्रा. रसिका चाफले आणि प्रा. अमित बनकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत संचालक अभिषेक बेलखेडे आणि उपप्राचार्य डॉ. पऱ्हाते यांनी केले. मागील काही वर्षांत महाविद्यालयात झालेल्या विकास प्रकल्पाचे माजी विद्यार्थ्यांनी कौतुक केले. (वा.प्र.)
सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST