शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपुरात अप्रशिक्षित करताहेत घरांचा सर्वे; सायबरटेककडे कुशल मनुष्यबळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 10:50 IST

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शहरातील घरांचा सर्वे करण्याची जबाबदारी मे. सायबरटेक सिस्टिम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीवर सोपविण्यात आली. परंतु चुकीच्या सर्वेमुळे प्रचंड प्रमाणात घरटॅक्स वाढला.

ठळक मुद्देकशी होणार योग्य टॅक्स आकारणी

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शहरातील घरांचा सर्वे करण्याची जबाबदारी मे. सायबरटेक सिस्टिम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीवर सोपविण्यात आली. परंतु चुकीच्या सर्वेमुळे प्रचंड प्रमाणात घरटॅक्स वाढला. नागरिकांतील रोष विचारात घेता, नगरसेवकांनी सभागृहात चुकीचा सर्वे रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार दुपटीपेक्षा अधिक कर न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानंतरही सायबरटेक कंपनी अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सर्वे करीत असल्याने योग्य टॅक्स आकारणी कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील सहा लाख मालमत्तांचा सर्वे केला जात आहे, सोबतच नवीन मालमत्तावर कर आकारणी केली जात आहे. सायबरटेक कंपनीला आॅक्टोबर २०१७ पूर्वी ७२ वॉर्डातील सर्वे करावयाचा होता. त्यानंतर डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु या कालावधीतही सर्वेचे काम पूर्ण झालेले नाही. मार्च २०१८ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने सुरू असलेल्या सर्वेत पुन्हा त्रुटी व चुका राहण्याची शक्यता आहे.सर्वेचे काम अपूर्ण असल्याने डिसेंबरपूर्वी टॅक्स न भरल्यास मार्च २०१८ पर्यंत आकारण्यात येणारी २ टक्के शास्ती लावली जाणार नाही; मात्र सर्वेची गती विचारात घेता मार्चपर्यंत सर्वेचे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. डिसेंबरपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेनंतर शहरातील ३ लाख १० हजार १७८ हाऊस युनिटचा डाटा पुनर्मूल्यांकनासाठी मालमत्ता विभागाकडे सादर करण्यात आला. यातील २ लाख ६ हजार २८६ हाऊ स युनिटला मंजुरी देण्यात आली आहे, तर ८१ हजार १२७ हाऊ स युनिटच्या सर्वेक्षणात त्रुटी असल्याने हा डाटा फेटाळण्यात आला आहे. जवळपास ४० टक्के घरांचा सर्वे करण्यात आला. यातील एक लाख लोकांना डिमांड पाठविण्यात आल्या. मात्र सर्वेनंतर टॅक्स प्रचंड वाढल्याने नागरिकांत असंतोष पसरला. चुकीच्या सर्वेविरोधात विरोधी पक्षातर्फे वेळोवेळी आंदोलने करण्यात आली.नागरिकांतील रोष विचारात घेता सर्वेसाठी सायबरटेक कंपनीकडून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती होईल. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत महापालिकेच्या कर आकारणी विभागातील कर्मचारी राहतील अशी अपेक्षा होती. परंतु सभागृहात यावर वादळी चर्चा झाल्यानतंरही सर्वे करण्याच्या पद्धतीत सुधारणा झालेली नाही.

डाटा संकलनाचा दावासायबरटेक कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्वेवर नागरिकांचा आक्षेप असला तरी सर्वेमुळे शहरातील मालमत्तांचा डाटा संकलित होत आहे. सर्वेच्या वेळी घरांचे फोटो काढून अपलोड केले जात आहे. यामुळे नवीन मालमत्तांवर कर आकारणी होत आहे, असा दावा कर आकारणी विभागातील अधिकाऱ्यांनी केला.

महापालिकेकडे माहिती नाहीसायबरटेक कंपनीने सर्वेसाठी किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांचे शिक्षण, अनुभव याबाबत महापालिकेच्या कर आकारणी विभागाकडे माहिती उपलब्ध नाही. नगरसेवकांकडून याची मागणी झाल्यानंतर आता हा डाटा संकलित केला जात आहे.

सभागृहात पुन्हा सर्वेचा मुद्दा गाजणारमालमत्ता कर आकारणीसाठी नेमण्यात आलेल्या मे. सायबरटेक कंपनीकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या,त्यांची नावे व शिक्षण यासंदर्भात काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. २० जानेवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात माहिती उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सभागृहात पुन्हा सर्वेचा मुद्दा गाजणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका