शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील दिव्यांग व रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 10:39 IST

दिव्यांगांसाठीचा निधी खर्च व्हावा, यासाठी महापालिका दिव्यांगांचे तसेच शहरातील रस्त्यांवर वास्तव्यास असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील यांनी मंगळवारी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देमहिला व बालकल्याण समितीचा निर्णयदिव्यांगांचा चार कोटींचा निधी अखर्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी तरतूद असलेला चार कोटींचा निधी गेल्या वर्षात अखर्चित राहिला. तर महिला व बालकल्याण विभागासाठी ७.३४ कोटींची तरतूद असतानाही ४.३१ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. दिव्यांगांसाठीचा निधी खर्च व्हावा, यासाठी महापालिका दिव्यांगांचे तसेच शहरातील रस्त्यांवर वास्तव्यास असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील यांनी मंगळवारी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली.महिला व बालकल्याण विभागाचा गेल्या वर्षातील अखर्चित निधीसह पुढील वर्षात २० कोटींची तरतूद करण्याची मागणी स्थायी समितीकडे करण्यात येईल. २०१४-१५ मध्ये दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात ७,९५७ दिव्यांग शहरात असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र या सर्वांना दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीने झोननिहाय सर्वेक्षण करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या बालकांचा सर्वे करण्याकरिता महापालिकेने कृती दल गठित करण्यात आले आहे. यात विविध विभागातील अधिकारी, सेवाभावी संस्थांचा समावेश आहे. कृती दलामार्फ त बालकांचे पालनपोषण करण्यात येईल. महापालिका शाळेत सॅनिटरी नॅपकीन मशीन्स लावण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.बैठकीला समिती सदस्या दिव्या धुरडे, रश्मी धुर्वे, मनीषा अतकरे, वैशाली नारनवरे, खान नसीम बानो मो. इब्राहिम, जिशानमुमताज मो. इरफान अन्सारी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौंगजकर, गिरीश वासनिक, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, बाजार अधीक्षक मदन सुभेदार प्रामुख्याने उपस्थित होते.

बचत गटाच्या महिलांना रोजगारगरजू महिलांना समाजकल्याण विभागाद्वारे काचबटन आणि शिवणयंत्र वाटपाचा आढावा घेण्यात आला. यावरील खर्च २५ लाखांहून अधिक असल्याने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर केला जाणार आहे. बचत गटातील महिलांना रोजगार मिळण्यासाठी त्यांच्यावर उद्यानांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्याचा विचार आहे. यासाठी उद्यान विभागाद्वारे महिला बचत गटातील महिलांना उद्यानाच्या कामाचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात चर्चा झाली. बचत गटाच्या महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी झोननिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका