शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

आरटीओ दक्षता पथकावर रेतीमाफियांची पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST

जगदीश जोशी नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुंबईतून आलेले दक्षता पथक नागपूरमध्ये दोन दिवसापासून ठिय्या मांडून ...

जगदीश जोशी

नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुंबईतून आलेले दक्षता पथक नागपूरमध्ये दोन दिवसापासून ठिय्या मांडून आहे. परंतु, त्यांना अद्याप समाधानकारक यश मिळाले नाही. हे पथक सिव्हिल लाईन्स येथील रविभवनमध्ये थांबले आहे. रेतीमाफियांनी या पथकावर सतत लक्ष ठेवण्यासाठी आठ तरुणांना तैनात केले आहे. ते तरुण दक्षता पथकाचा सावलीसारखा पाठलाग करतात व रेतीमाफियांना पथक कुठे आहे, काय करीत आहे, इत्यादी माहिती देतात. त्यामुळे रेतीमाफिया स्वत:ला सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत.

आरटीओमधील भ्रष्टाचार नेहमीच चर्चेचा विषय असतो. दीड वर्षापूर्वी केवळ तीन वर्षे सेवा झालेल्या उपनिरीक्षकाकडे दीड कोटी रुपयाची अपसंपदा आढळून आली होती. त्यानंतरही अनेक आरटीओ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारासाठी कारवाई करण्यात आली. आठ महिन्यापूर्वी ओव्हरलोड वाहनांकडून लाच वसुलीसाठी आरटीओ अधिकाऱ्यांचे दोन गट तयार झाले होते. एका गटाने दुसऱ्या गटाविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ते प्रकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचले होते. परंतु, ओव्हरलोड वाहतूक थांबली नाही. यासंदर्भात काही पीडित नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली होती. गडकरी यांनी २२ ऑक्टोबर रोजी मुख्य सचिव संजीवकुमार यांना पत्र लिहून आरटीओमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास सांगितले होते. दरम्यान, शहर पोलिसांनी रेतीमाफियांवर कारवाई मोहीम राबवून खळबळ उडवून दिली. त्यामुळे रेतीमाफिया ग्रामीण व अन्य भागाकडे वळले.

सूत्रांच्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी परिवहन सचिव अविनाश ढाकणे भ्रष्टाचाराची माहिती घेण्यासाठी नागपुरात आले होते. त्यांच्या आदेशामुळे परिस्थिती बदलली नाही. परिणामी, दक्षता पथकाला पाठविण्यात आले. परंतु, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या पथकाच्या आगमनाची माहिती फोडून रेतीमाफियांना सतर्क केले. रेतीमाफियांनी लगेच रणनीतीमध्ये बदल केला. यासंदर्भात पथकाचे प्रमुख अविनाश सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

------------------

नायक झाला खलनायक

ओव्हरलोड वाहतुकीचा नायक सत्य पुढे आणण्यासाठी प्रयत्नरत व्यक्तींमध्ये खलनायक झाला आहे. संबंधित नायकाला तीन वर्षापूर्वी अमरावती एसीबीने लाखो रुपयासह पकडले होते. तो नांदेडमधील अधिकाऱ्याच्या मदतीने ओव्हरलोडचे रॅकेट संचालित करीत होता. आधी हे काम करणाऱ्या अधिकाऱ्याने व्हीआरएस घेतली आहे.