नागपूर : न्यायालयाकडून दोन दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश मिळाल्यामुळे संशयित माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबा याने शुक्रवारी आत्मसमर्पण केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्राला अटक झाल्यानंतर त्याने पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या रामलाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक असलेल्या साईबाबाला अहेरी पोलिसांनी सीपीआय-माओवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या संशयावरून ९ मे २०१४ रोजी अटक केली होती. शुक्रवारी कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केल्यानंतर विशेष सेलमध्ये पोहचवण्यात आले.
संशयित माओवादी साईबाबाचे आत्मसमर्पण
By admin | Updated: December 26, 2015 03:35 IST