शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रिया रखडल्या, रुग्णांना फटका

By admin | Updated: March 21, 2017 01:58 IST

धुळे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद येथील निवासी डॉक्टरांना मारहाणीचे प्रकरण निवळत नाही, ...

मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन नागपूर : धुळे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद येथील निवासी डॉक्टरांना मारहाणीचे प्रकरण निवळत नाही, तोच सोमवारी सकाळी पुणे येथील वाढिया रुग्णालयात पुन्हा एका डॉक्टरवर हल्ला झाला. यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असून सुरक्षेचा मुद्दा रेटून धरत सोमवार सकाळी ८ वाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले. परिणामी, नागपूरच्या मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ५० टक्के शस्त्रक्रिया रखडल्या. हे आंदोलन आणखी काही दिवस चालल्यास या तीनही रुग्णालयात रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ३४७ निवासी डॉक्टर असून सोमवारी २८४ डॉक्टर कामबंद आंदोलनात सहभागी झाले. जोपर्यंत रुग्णालयात सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कामावर अनुपस्थित राहू, अशी अट घालत स्वाक्षऱ्यांचे पत्र आज दुपारी अधिष्ठात्यांना दिले. परिणामी, बाह्यरुग्ण विभागापासून ते अपघात विभाग व वॉर्डात कधी नव्हे ते वरिष्ठ डॉक्टर सेवा देताना दिसून आले. शासकीय रुग्णालयाचा कणा असलेले निवासी डॉक्टरच आज कामावर गैरहजर असल्याने वेळेवरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या व फारच गंभीर रुग्णांना वॉर्डात भरती करण्यात आले. असे असले तरी रुग्णालय प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे ४० महत्त्वाच्या शस्त्रक्रिया झाल्या. तर बाह्यरुग्ण विभागात २८३३ रुग्णांना तपासून ९२ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. मात्र डॉक्टरांचे आंदोलन आणखी काही दिवस चालल्यास रुग्णसेवा प्रभावित होण्याचे खुद्द वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी सुरक्षेच्या मुद्याला घेऊन सोमवारी दुपारी अधिष्ठाता कक्षासमोर जोरदार नारेबाजी केली. रुग्णालयात काम करीत असताना असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने गैरहजर राहत असल्याच्या स्वाक्षरीचे पत्रही अधिष्ठात्यांना दिले. मेयोतही निवासी डॉक्टरांनी हल्ल्याचा निषेध करीत सुरक्षा वाढविण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन व्यक्तिगतस्तरावर घेतले असून यात ‘मार्ड’ संघटनेचा हस्तक्षेप नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)मेयोत ‘मायनर’ शस्त्रक्रियांना बसला फटकाइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) १५० निवासी डॉक्टरांपैकी ११० डॉक्टर कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. रुग्णालयात रोज सुमारे ३०वर महत्त्वाच्या तर ४०वर किरकोळ शस्त्रक्रिया होतात. परंतु निवासी डॉक्टरांच्या आंदोलनामुळे केवळ २० महत्त्वाच्या शस्त्रक्रिया झाल्या, तर एकही किरकोळ शस्त्रक्रिया झाली नाही.‘सुपर’मधील अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी ठप्पमेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ निवासी डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे या रुग्णालयात सोमवारी कश्यातरी तीन शस्त्रक्रिया होऊ शकल्या. मात्र, एकही अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी झाली नाही. यामुळे हृदयरोग रुग्णांना मोठा फटका बसला. मंगळवारीही कामबंद आंदोलन राहिल्यास या व इतरही शस्त्रक्रिया रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.