‘सर्जिकल स्ट्राईक’चे उपराजधानीत स्वागतपाकिस्तानला दणका आवश्यकच होता मंगेश व्यवहारे नागपूरपाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत वेगळाच उत्साह दिसून येत आहे. भारतीय सैन्यदलात सेवा देऊन चुकलेले व अखेरपर्यंत सैनिक म्हणूनच जगण्याचा संकल्प घेतलेले सुधाकर मोरे यांचा उत्साहदेखील अवर्णनीयच आहे. हल्ल्याची बातमी ऐकताच १९६२, १९६५ व १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या ७६ वर्षीय मोरे यांची छाती गर्वाने फुलून आली. आपसूकच त्यांच्या तोंडातून शब्द निघाले, ‘मुझे चिंता नही है स्वर्ग जाकर मोक्ष पाने की, तिरंगा हो कफन मेरा बस यही अरमान रखता हूं’ ! केवळ सुधाकर मोरेच नव्हे तर उपराजधानीतील अनेक माजी सैनिक युद्ध झाल्यास युद्धभूमीत जाण्यासाठी तयार आहेत. ‘वन्स अ सोल्जर, आॅलवेज अ सोल्जर’ असे म्हणतात ते उगाच नाही याचा प्रत्यय उपराजधानीतील नागरिकांना येत आहे.उरीच्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईचे उपराजधानीत सर्वत्र स्वागत होत आहे. ‘लातों के भूत बातों से नही मानते’ असे म्हणत माजी सैनिकांनी तर अक्षरश: आनंदोत्सव साजरा केला. या हल्ल्याची परिणती युद्धात होऊ शकते याची सर्वांनाच कल्पना आहे. जर युद्ध झाले तर देशासाठी आजही छातीवर गोळ्या खायला तयार आहोत. देशाच्या मातीचे आमच्यावर कर्ज आहे व मातृभूमीसाठी आजदेखील रणभूमीत सर्वस्व अर्पण करायला तयार आहे, अशा भावना माजी सैनिकांनी बोलून दाखविल्या. राम कोरके, सिद्धार्थ मंडपे, दत्ता चिरडे, विलास दवणे, सुनील फुटाणे, नीळकंठ व्यास, गुंडेराव ढोबळे, बाबू गनी खान, अशोक भुजाडे, मनोहर भातकुलकर, चंद्रशेखर आलेगावकर, पुंडलिक सावंत या माजी सैनिकांनीही अशीच भावना व्यक्त केली.
है तय्यार हम!
By admin | Updated: September 30, 2016 03:16 IST