शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 10:04 IST

'संगीत सम्राट' व 'सा रे ग म लिटील चॅम्प्स'चा पुरस्कार जिंकणारी गोड गळ्याची बालगायिका अंजली गायकवाड व मथुरेच्या शास्त्रीय गायनाची परंपरा पुढे चालवणारे ब्रजवासी ब्रदर्स हे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ चे विजेते ठरले आहेत.

ठळक मुद्देअंजली गायकवाड, ब्रजवासी ब्रदर्स ठरले विजेते शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मानया मान्यवरांनी केली विजेत्यांची निवड संंगीतकार आणि गायक शंकर महादेवन, संगीत दिग्दर्शक प्रीतम, सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक रूपकुमार आणि सोनाली राठोड, शास्त्रीय संगीत तज्ज्ञ शशी व्यास आणि टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर या मान्यवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : 'संगीत सम्राट' व 'सा रे ग म लिटील चॅम्प्स'चा पुरस्कार जिंकणारी गोड गळ्याची बालगायिका अंजली गायकवाड व मथुरेच्या शास्त्रीय गायनाची परंपरा पुढे चालवणारे ब्रजवासी ब्रदर्स हे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ चे विजेते ठरले आहेत.लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ चे वितरण शुक्रवार, २३ मार्च रोजी नागपुरात होत आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ६ वाजता आयोजित या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते बांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंजली गायकवाड व ब्रजवासी ब्रदर्स यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे यंदाचे हे पाचवेवर्ष आहे. परिवार चाय प्रस्तुत आणि हिलफोर्ट पब्लिक स्कूल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला असून, ९२.७ बिग एफएम हे रेडिओ पार्टनर तसेच ब्राईट आऊटडोअर हे या कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर व ग्रीन ट्युन्स हे ग्रीन पार्टनर आहेत. लोकमत सखी मंच व कॅम्पस क्लब सदस्यांसाठी लोकमत कार्यालयात पासेस उपलब्ध असतील.अंजली गायकवाडझी युवा वाहिनीच्या संगीत सम्राट शोमध्ये आपल्या जादुई आवाजाने विजेतेपदावर मोहोर उमटवणारी नगरची कन्या अंजली गायकवाड हिने सा रे ग म प लिटील चॅम्प शोही जिंकला आहे. अंगद आणि मनिषा गायकवाड या दाम्पत्याच्या पोटी २८ फेबु्रवारी २००६ साली अंजलीचा जन्म झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अंजलीने संगीत साधना सुरू केली. वडील अंगद हेच तिचे प्रथम गुरू आहेत. अंजली पाच वर्षांची असतानाच तिने राज्यस्तरीय भक्तिगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तेव्हापासून सुरू झालेला तिच्या यशाचा प्रवास अविरत सुरूच आहे. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहेमान यांनी तिचा आवाज ऐकून तिला अ बिलियन ड्रीम्स या चित्रपटात गायची संधी दिली. महाराष्ट्राच्या या प्रसिद्ध बालगायिकेने आता सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.वहिदा रहमान, अंकित तिवारीला ऐकण्याची उत्सुकतायंदाच्या या पाचव्या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण वहिदा रहमान यांची मुलाखत आणि तरुणाईचा लाडका गायक अंकित तिवारी यांची संगीतमय श्रद्धांजली हे विशेष आकर्षण राहणार आहेत. याप्रसंगी प्रसिद्ध चित्रपट व संगीत समीक्षक, लेखिका भावना सोमय्या अभिनेत्री वहिदा रहमान यांची ३० मिनिटांची मुलाखत घेणार आहेत. अंकितचे गाणे व वहिदा रहमान यांचे अनुभव ऐकण्यासाठी नागपूरकर प्रचंड उत्सुक आहेत.

ब्रजवासी ब्रदर्सब्रजवासी ब्रदर्स आजोबांच्या संगीत परंपरेला आपल्या प्रतिभेने समृद्ध करीत आहेत. सा रे ग म प लिटील चॅम्प जिंकणाऱ्या ब्रजवासी ब्रदर्स यांनाही त्यांचे वडील हुकूमचंद यांनीच संगीताचे प्राथमिक धडे दिले. त्यांनी आॅस्कर विजेत्या संगीतकार ए. आर. रहमान यांच्या समूहातही काम केले आहे. हेमंत ब्रजवासी याचे गाणे ऐकून तर आशा भोसले यांना अश्रू आवरणे कठीण झाले होेते. सुफी संगीताला आपल्या खास अंदाजात शास्त्रीय संगीतात गुुंफणे ही या भावंडांची विशेषता आहे. केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देश-विदेशात त्यांना ऐकले जात आहे. ब्रजवासी ब्रदर्स यांचे संगीत क्षेत्रातील हे योगदान बघून त्यांना सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

टॅग्स :Sur Jyotsna National Music Award 2018सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१८