शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक : तपास यंत्रणांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 21:54 IST

Supporter of Taliban militants arrested तालिबानी अतिरेक्याच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला होता.

ठळक मुद्देअतिरेकी असल्याचा संशयअफगाणी नागरिक११ वर्षांपासून छुपे वास्तव्यशरीरावर मिळाली बंदुकीच्या गोळीची जखम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तालिबानी अतिरेक्याच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला होता. त्याच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीची जखम (व्रण) दिसून आल्याने तसेच तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. महत्त्वाचे म्हणजे, नूरचा मतीन नामक साथीदार अचानक फरार झाल्यामुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाले आहे. त्याचमुळे तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. नूर मोहम्मद (वय अंदाजे ३० वर्षे) असे नाव असलेला एक अफगाणी नागरिक दिघोरी परिसरात राहतो. त्याचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी नूर मोहम्मदवर नजर ठेवली. सोशल मीडियावर तो तालिबानी अतिरेक्यांना फॉलो करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच विशेष शाखा आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी मंगळवारी नूर मोहम्मदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसेन्सही मिळाले. तो येथे २०१० पासून वास्तव्याला असल्याचे उघड झाले. नूर मोहम्मदच्या शरीरातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याचे निशाण (व्रण) आहे. त्याच्या मोबाईलची पोलिसांनी तपासणी केली असता तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या. आम्ही या संबंधाने चाैकशी करीत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले आहे.

मतीन फरार, संशय अधिक घट्ट

नूर मोहम्मद येथे मतीन नामक साथीदारासह राहत होता. हे दोघे २०१० मध्ये नागपुरात येण्यापूर्वी नूर मोहम्मद ज्या गावात राहत होता, ते गाव तालिबानी अतिरेक्यांचा गड मानले जाते. त्याच्या कुटुंबात तिकडे आईवडील आणि दोन भाऊ होते. त्यातील आईवडील आणि एका भावाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ बेपत्ता असल्याचे नूरने सांगितल्याचे समजते. नूरला पोलिसांनी पकडल्याचे लक्षात येताच मतीन फरार झाला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच वाढला आहे. हे दोघे नुसते तालिबानी समर्थक आहे की तालिबानी अतिरेकी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मतीन पळाला आसामकडे

विशेष म्हणजे, आधी कंबल विकणाऱ्या मतीनने नंतर नागपुरात अवैध सावकारी सुरू केली. त्यातून त्याने बनावट आधार कार्डसह अनेक कागदपत्रे जमविली. मोठी मालमत्ताही नागपुरात खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. फरार असलेल्या मतीनविरुद्ध २०१७ मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. मतीन आसाम, मेघालयकडे पळून गेला असावा, असा पोलिसांना संशय असून, त्या राज्यातील तपास यंत्रणांना तशी माहिती देऊन त्याला पकडण्यासाठी पोलीस कामी लागले आहेत.

रेकीचा संशय, तपास यंत्रणा सरसावल्या

नागपूर शहर विविध दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर खूप वर्षांपासून आहे. येथे यापूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर, तब्बल ११ वर्षांपासून नागपुरात अवैध वास्तव्य करणाऱ्या नूर मोहम्मद आणि मतीनने नागपूरची रेकी करून तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर काही मटेरियल पाठवले का, असा संशय आहे. त्यामुळे आम्ही कसून चाैकशी करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले. नूरकडून कसलेही शस्त्र जप्त करण्यात आले नाही. मात्र, एक व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये सापडला. त्यामुळे तो हिंसक वृत्तीचा असल्याचे लक्षात येते. या संबंधाने एटीएस, आयबीसह विविध तपास यंत्रणांनी नूर मोहम्मदची चाैकशी चालविली आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीArrestअटक