शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात घाणेरड्या पाण्याचा पुरवठा, निकटवर्तीय आमदार संदीप जोशी संतापले

By योगेश पांडे | Updated: August 4, 2025 20:00 IST

Nagpur : स्ववलंबी नगर आणि दीनदयाल नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना घाणेरडं, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास धोकादायक पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विधानपरिषद सदस्य संदीप जोशी यांनी मनपा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातील स्ववलंबी नगर आणि दीनदयाल नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना घाणेरडं, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास धोकादायक पाणी पुरवठा केला जात आहे. या गंभीर समस्येकडे नागपूर महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांना पत्रदेखील पाठविले आहे.

या भागात गेल्या १५ ते २० दिवसांपासून नळांमधून दुर्गंधीयुक्त, गढूळ आणि वापरण्यायोग्य नसलेलं पाणी येत असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मुख्यमंत्री असलेल्या मतदारसंघात जर ही परिस्थिती असेल तर शहराच्या इतर भागांत काय चालू असेल याची कल्पनाच करवत नाही. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन गप्प असेल, तर सामान्य जनतेचा आवाज कुणी ऐकायचा असा संतप्त सवाल जोशी यांनी केला आहे.

नागरिक सोशल मीडियावर सातत्याने तक्रारी पोस्ट करत आहेत. मीही प्रत्यक्ष या तक्रारी अनुभवल्या आहेत. अनेकांनी पाण्यामुळे त्रास होतोय असं स्पष्ट सांगितलं आहे. तुम्ही गप्प बसलात, म्हणून आम्हीही गप्प बसू, असा गैरसमज करू नका. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नाही तर परिसरातील जनतेसह मी स्वत: गुरुवार ७ ऑगस्ट रोजी आयुक्तांच्या कार्यालयात धडक देईन. नागरिकांच्या रोषाला आयुक्तांना सामोरे जावे लागेल. लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला तर ती संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाची असेल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे..

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwater transportजलवाहतूकSandip Joshiसंदीप जोशी