शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विशाल सिंगुरी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक; विदर्भाला मिळाले अनेक नवीन अधिकारी

By योगेश पांडे | Updated: November 20, 2023 22:53 IST

गृहविभागातर्फे विदर्भासह राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

योगेश पांडे नागपूर : गृहविभागातर्फे विदर्भासह राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नक्षल विरोधी अभियान, विशेष कृती दलाचे (एएनओ) अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांच्याकडे अमरावती ग्रामीण अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी गृह मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले. सिंगुरी यांच्या व्यतिरिक्त गृह मंत्रालयाने अधीक्षक आणि अतिरिक्त अधीक्षक दर्जाच्या इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिंगुरी यांची ऑगस्ट महिन्यात ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावरून एएनओमध्ये बदली करण्यात आली होती.

नागपूर शहर पोलिसांनाही दोन उपायुक्त देण्यात आले आहेत. भारतीय पोलीस सेवा २०१९ बॅचचे अधिकारी निकेतन कदम आणि अमरावती ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तर गडचिरोलीचेे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची वाशीमच्या पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. गोंदियाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांची जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी तर पुण्याचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची नागपूर येथे नागरी हक्क संरक्षणच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे लोहमार्ग अपर अधीक्षक गणेश शिंदे यांच्याकडे अमरावती शहर उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नागपूर झोन पाचचे उपायुक्त श्रवण दत्त व वाशीमचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांचीही येत्या काही दिवसांत बदली होणार आहे. त्यांच्या बदलीचा स्वतंत्र आदेश जारी केला जाईल. नाशिक येथील नागरी हक्क संरक्षणचे अधीक्षक विक्रम साळी यांची अमरावती ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. एम.रमेश यांची अपर पोलीस अधीक्षक-गडचिरोली, नित्यानंद झा यांची अपर पोलीस अधीक्षक-गोंदिया येथे पदस्थापना करण्यात आली आहे.