शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर’ होणार आणखी सुपरफास्ट

By admin | Updated: May 25, 2016 02:36 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदभरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य सचिवांनी तातडीने बैठक बोलवत मंजूर पदांना तडकाफडकी प्रशासकीय मान्यता दिली.

१६५ पदांना मान्यता : ३ प्राध्यापकांसह २७ निवासी डॉक्टरांचा समावेशनागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदभरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य सचिवांनी तातडीने बैठक बोलवत मंजूर पदांना तडकाफडकी प्रशासकीय मान्यता दिली. विशेष म्हणजे ‘सुपर’ला लॉटरी लागली असून १६५ पदांना मान्यता मिळाली आहे. यात ३ प्राध्यापकांसह २७ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये चांगल्या दर्जाची सेवा मिळत असल्याने रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु त्या तुलनेत मंजूर असलेली ३६७ पदे कमी पडत आहे. रुग्णसंख्या पाहता विविध ७५८ पदांची आवश्यकता आहे. ३९१ पदांची कमतरता भासत आहे, परिणामी रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यामुळे ‘सुपर’ भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषास पात्र ठरत नाही. यातून पदव्युत्तर शाखेचे अनेक अभ्यासक्रम देखील रेंगाळले आहेत. ही पदे भरली जात नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देताना खंडपीठाने ही पदे तीन महिन्यांत भरण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) दिले होते. यावर डीएमईआरने खंडपीठाला शपथपत्रही सादर केले. परंतु याची मुदत येऊनही पदे भरली गेली नाहीत. यामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका पुन्हा खंडपीठासमक्ष आली. त्यावर सुनावणी देताना खंडपीठाने मुख्य सचिवांसह, संचालकांनाही नोटीस बजावली होती. हा न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी शुक्रवारी बैठक बोलावली होती. त्यात ‘सुपर’साठी १६५ पदांना प्रशासकीय मान्यता तडकाफडकी प्रदान केली. आर्थिक तरतुदीसाठी ही पदे आता आगामी जुलैत होणाऱ्या मंत्रिमंडळापुढे सादर होणार आहेत. (प्रतिनिधी)या पदांना मिळाली मान्यतायूरोलॉजी, एन्डोक्रेनोलॉजी व पॅथालॉजी विभागाला प्रत्येक एक प्राध्यापकाच्या पदाला मान्यता मिळाली आहे. न्यूरोलॉजी, सीव्हीटीएस, न्यूरोसर्जरी, एन्डोक्रेनोलॉजी, हॉस्पिटल अ‍ॅडमिनीस्ट्रेशनमध्ये प्रत्येकी एक सहायक प्राध्यापकासह १२ लेक्चर्स मिळाले आहेत. यात सीव्हीटीएस विभागाला दोन, न्यूरोलॉजीला एक, युरोलॉजीला एक, एन्ड्रोक्रनोलॉजीला दोन, अ‍ॅनेस्थेशियाला तीन आणि हॉस्पिटल अ‍ॅडमिनीस्ट्रेशनला दोन लेक्चर मिळाले आहेत. या शिवाय १०९ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता देण्यात आली.एन्डोक्रेनोलॉजी आणि न्यूरॉलॉजीचा विभाग सुरू होणारसुपरमध्ये एन्डोक्रेनोलॉजी आणि न्यूरॉलॉजीची पदे भरली जात नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमात अडथळा निर्माण झाला होता. आता या दोन्ही विभागात प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, लेक्चर यांच्यासह वॉर्ड मंजूर झाल्याने या विभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.