शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : वर्षभरात ३६३ हृदय शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:55 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्वी गुंतागुंतीच्या व गंभीर स्वरुपातील हृदय शस्त्रक्रिया होत नसल्याचा तक्रारी होत्या. येथील रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जात असल्याचेही आरोप होते. परंतु गेल्या वर्षापासून या सर्व शस्त्रक्रिया आता ‘सुपर’मध्ये होऊ लागल्या आहेत. जुलै २०१८ ते जून २०१९ या दरम्यान ३६३ हृदय शस्त्रक्रिया झाल्या. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य रुग्ण हे खासगी हॉस्पिटलने नाकारलेले व आर्थिक स्थिती बेताची असलेले होते.

ठळक मुद्देसीव्हीटीएस विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्वी गुंतागुंतीच्या व गंभीर स्वरुपातील हृदय शस्त्रक्रिया होत नसल्याचा तक्रारी होत्या. येथील रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जात असल्याचेही आरोप होते. परंतु गेल्या वर्षापासून या सर्व शस्त्रक्रिया आता ‘सुपर’मध्ये होऊ लागल्या आहेत. जुलै २०१८ ते जून २०१९ या दरम्यान ३६३ हृदय शस्त्रक्रिया झाल्या. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य रुग्ण हे खासगी हॉस्पिटलने नाकारलेले व आर्थिक स्थिती बेताची असलेले होते.मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा ‘सीव्हीटीएस’ विभागाची जबाबदारी प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. निकुंज पवार यांच्याकडे विभाग प्रमुख म्हणून जुलै २०१८ मध्ये सोपविण्यात आली. त्यांनी आल्या आल्या शस्त्रक्रियेचा सपाटा सुरू केला. विशेष म्हणजे, हृदय बंद पाडून, ४० मिनिटे रक्ताभिसरण थांबवून महाधमनीवर अत्यंत गुंतागुंतीची असलेली ‘अ‍ॅरोटिक असेन्डिंग डिसेक्शन’ सारख्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या. परिणामी, कमी दिवसातच सीव्हीटीएस’ विभागात रुग्णांची गर्दी दुपटीने वाढली. जून २०१९ पर्यंत ३६३ हृदय शस्त्रक्रिया डॉ. पवार यांच्या मार्गदर्शनात पार पडल्या. यात डॉ. अंबरीश, डॉ. चंदन व डॉ. कुणाल यांनी सहकार्य केले.मृत्यूचे प्रमाण २० टक्क्याहून ६.८ टक्क्यांवरजुलै २०१७ ते जून २०१८ या कालावधीत हृदय शस्त्रक्रियेनंतर १०९ रुग्णांचे मृत्यू झाले होते. हे प्रमाण २० टक्के होते. परंतु जुलै २०१८ ते जून २०१९ या कालावधीत हे मृत्यूचे प्रमाण ६.८ वर आले आहे. परिणामी, शुल्क भरून हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली. गेल्या वर्षात ५५ रुग्णांनी शुल्क भरून हृदय शस्त्रक्रिया केल्या.‘रेक्सप्लोरेशन’चे प्रमाण आले ०.८ टक्क्यांवरहृदय शस्त्रक्रियेनंतर हृदयात रक्तस्राव होणे, ‘बीपी’ खूप जास्त राहणे किंवा इतरही समस्या येत असल्यास पुन्हा शस्त्रक्रियेची गरज पडणाऱ्या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत ‘रेक्सप्लोरेशन’ म्हटले जाते. जुलै २०१७ ते जून २०१८ या कालावधीत अशा ३५ शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. परंतु जुलै २०१८ ते जून २०१९ या वर्षात अशा केवळ तीनच शस्त्रक्रिया झाल्या. टक्केवारी नुसार हे प्रमाण ०.८ टक्के एवढे आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘सीव्हीटीएस’ विभागात येणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यातही ९९ टक्के रुग्ण हे खासगी हॉस्पिटलने नाकारलेले असतात. कारण अशा रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते. शिवाय, या रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताचीच राहत असल्याने हे रुग्ण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येतात. गेल्या वर्षात अशा ३६३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.डॉ. निकुंज पवारप्रमुख, सीव्हीटीएस विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHeart Diseaseहृदयरोग