शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांच्या अंगणात उजळली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:50 IST

दिवाळी हा आनंदाचा सण. फराळ, फटाके, नवीन कपडे यांची या प्रकाशपर्वात नुसती चंगळ असते. परंतु ज्यांना दोनवेळच्या अन्नाची भ्रांत आहे त्यांच्या अंधारलेल्या अंगणी साध्या पणतीलाही तेल लाभत नाही.

ठळक मुद्देआदर्श उपक्रम : कर्तव्यम् बहुद्देशीय संस्थेतर्फे अनाथ विद्यार्थ्यांना भेटवस्तू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळी हा आनंदाचा सण. फराळ, फटाके, नवीन कपडे यांची या प्रकाशपर्वात नुसती चंगळ असते. परंतु ज्यांना दोनवेळच्या अन्नाची भ्रांत आहे त्यांच्या अंधारलेल्या अंगणी साध्या पणतीलाही तेल लाभत नाही. फराळ, फटाके, नवीन कपडे ही तर फारच लांबची गोष्ट. अशा वंचित जीवांनाही दिवाळीचा हा आनंद उपभोगता यावा, या उद्देशाने कर्तव्यम् बहुद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आणि तीन अनाथालयातील सुमारे १०० विद्यार्थ्यांसोबत कौटुंबिक वातावरणात दिवाळी साजरी करीत त्यांना भेटवस्तूही दिल्या. यामध्ये वंजारी नगरातील जिव्हाळा परिवार, कामठी रोडस्थित जीवन आश्रम परिवार आणि प्लॅटफार्म ज्ञान मंदिराच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. कर्तव्यम् बहुद्देशीय संस्थेने हा आदर्श उपक्रम चार वर्षांआधी सुरू केला. तेव्हापासून तो अविरत सुरू आहे. यंदा क्रीडा चौकातील भैयाजी पांढरीपांडे इन्स्टिट्यूट आॅफ सोशल वर्क महाविद्यालयात बुधवारी हा उपक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डी.सी.पी. एस. चैतन्य, आयआयटी गुरूकुलचे प्रवीण सर, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत आगलावे, कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक कांबळे, वृत्तपत्र वितरक संजय चोरडिया यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष प्रशांत तुंगार उपस्थित होते. यावेळी जीवन आश्रम परिवारचे विकास शेंडे, राकेश गजभिये यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात १०० विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. संचालन श्वेता सारंग तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधर हातागळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूषण पांढरे, सचिन घोडे, अभिजित केसरे, दीपक माने, सतीश कांचनकर, नितीन बावनकर, शुभम लोखंडे, मंगेश मुळे व अमोल नाचनकर यांनी सहकार्य केले.