शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सूर, ताल, लयचा अनोखा संगम आज

By admin | Updated: March 22, 2015 02:23 IST

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त ...

नागपूर : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त आज रविवारी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार चिटणीस पार्क, महाल येथे सेलिब्रिटी गायक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हरिहरन यांचा कार्यक्रम आणि चित्रपट अभिनेते जॉन अब्राहम यांच्या विशेष उपस्थितीने सूर, ताल आणि लयचा अनोखा संगम नागपूरकर रसिकांना अनुभवता येईल. हा कार्यक्रम सायंकाळी ५. ३० वाजता होईल. या कार्यक्रमात हरिहरन आणि त्यांच्या सोल इंडिया बँडचे कलावंत गझल आणि गीतांच्या सादरीकरणाने ही सायंकाळ अविस्मरणीय करणार आहेत. त्यात चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम तरुणाईशी खास संवाद साधणार असल्याने त्याचे आकर्षण आहे. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदाचे सन्मानचिन्ह राहणार आकर्षक यंदा सूर ज्योत्स्ना पुरस्कारासाठी तयार करण्यात आलेले सन्मानचिन्ह खास आकर्षक करण्यात आले आहे. यात शंख आणि ग्रामोफोनची आकृती असणार आहे. भारतीय संस्कृतीत शंखनादाला विशेष महत्त्व आहे. या सन्मानचिन्हाची निर्मिती बडोद्याचे शिल्पकार संदीप पिसाळकर यांनी केली आहे. या समारंभात श्रीमती ज्योत्स्ना दर्डाद्वारा लिखित ‘महावीर नमन’ या भजनांच्या अल्बमचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या अल्बममध्ये गायिका साधना सरगम, वैशाली सामंत, गायक सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि रुची कलंत्री यांच्या आवाजातील भजने असणार आहेत. कॉपीराईट कायद्यांतर्गत अल्बमचे सर्वाधिकार टाइम्स म्युझिक कंपनीला प्रदान करण्यात आले आहेत.प्रवेशपत्राचे वितरण सुरू लोकमत युवा नेक्स्ट, सखी मंच व कॅम्पस क्लबच्या सदस्यांना त्यांचे ओळखपत्र दाखविल्यावर चार व्यक्तींना थेट प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय लोकमतच्या वाचकांनी संबंधित जाहिरातीचे कात्रण लोकमत कार्यालयात दाखविल्यास त्यांना दोन व्यक्तींसाठी प्रवेशपत्र देण्यात येईल. यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत संपर्क करावा. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, रामदासपेठ येथे दूरध्वनी क्रमांक २४२९३५५ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.