शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

वन विभाग सचिवांना समन्स

By admin | Updated: July 8, 2016 02:54 IST

मनसर ते खवासा रोडचे चौपदरीकरण करण्यासाठी कापण्यात आलेल्या झाडांच्या मोबदल्यात नवीन झाडे

एक लाख झाडे लावलीच नाहीत : मनसर-खवासा रोड चौपदरीकरणनागपूर : मनसर ते खवासा रोडचे चौपदरीकरण करण्यासाठी कापण्यात आलेल्या झाडांच्या मोबदल्यात नवीन झाडे लावण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने वन विभागाला ७ कोटी ६८ लाख रुपये दिले आहेत. वन विभागाने उमरेड येथे १ लाख झाडे लावण्याची ग्वाही जुलै-२०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली होती. परंतु, गेल्या वर्षभरात एकही झाड लावण्यात आले नाही. यामुळे न्यायालयाने गुरुवारी शासनाची कानउघाडणी करून वन विभागाचे मुख्य सचिव व प्रधान मुख्य वन संवर्धक यांना समन्स बजावला. दोन्ही अधिकाऱ्यांना पुढच्या गुरुवारी (१४ जुलै) न्यायालयात उपस्थित राहून यावर स्पष्टीकरण सादर करायचे आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सुरुवातीला मनसर ते खवासा रोडवर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या ‘मिटिगेशन मेजर्स’वर चर्चा झाली. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (डब्ल्यूआयआय) व नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन आॅथारिटी (एनटीसीए) या आपापल्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्थांच्या तज्ज्ञांनी सखोल अभ्यास व आंतरराष्ट्रीय अहवाल पडताळून ‘मिटिगेशन मेजर्स’ दिले आहेत. त्यानुसार महामार्ग प्राधिकरणला या रोडवर ७५०, ३००, १००, ८०, ६५, ६० व ५० मीटरचे ‘अंडरपासेस’ बांधायचे आहेत. हे अंडरपासेस योग्य ठिकाणी बांधण्यात येत नसल्याचा आरोप वन विभागाने केला. महामार्ग प्राधिकरणने हा आरोप खोडून काढला. परिणामी न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या अधिकाऱ्यांना ‘मिटिगेशन मेजर्स’चे संयुक्तपणे निरीक्षण करण्याचे निर्देश दिलेत. यानंतर न्यायालयाने वृक्षारोपणावरून वन विभागाची कानउघाडणी केली. यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालय मित्र असून महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. अजय घारे व अ‍ॅड. अनिश कठाणे तर, मध्यस्थ माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्यातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)