शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना समन्स

By admin | Updated: January 21, 2016 02:55 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना २७ जानेवारी रोजी मूळ कागदपत्रांसह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

हायकोर्ट : याचिकेवर उत्तर देण्यास विलंबनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना २७ जानेवारी रोजी मूळ कागदपत्रांसह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.जयदीप मिनरल्स कंपनीने मायनिंग लीजच्या नूतनीकरणासाठी ३ सप्टेंबर २०१४ रोजी अर्ज सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर अद्यापही निर्णय घेतलेला नाही. यामुळे कंपनीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे राज्यघटनेतील अनुच्छेद १४ व १९(१)(जी)अंतर्गत देण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली झाली आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यावर उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पुरेसा वेळ दिला होता. गेल्या तारखेस शेवटची संधी म्हणून वेळ मंजूर करण्यात आला होता. हे प्रकरण बुधवारी सुनावणीसाठी आले असता सरकारी वकिलाने पुन्हा वेळ देण्याची विनंती केली. यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावला. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील एम.जी. भांगडे व अ‍ॅड. मोहित खजांची यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)